Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गडचिरोली :, चक्क दारूबंदी असतांना न्यायाधीशांच्या कक्षाबाहेर 'एकच प्याला', वकिलाचा....

गडचिरोली :, चक्क दारूबंदी असतांना न्यायाधीशांच्या कक्षाबाहेर 'एकच प्याला', वकिलाचा....


गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील एका घटनेने पोलीस विभागाची चांगलीच तारांबळ उडाली.


दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवारात मद्यपान करताना वकिलाच्या चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले.

ही कारवाई १८ जून रोजी दुपारी दीड वाजता केली. चक्क न्यायालयीन आवारात खिशात मद्याची बाटली घेऊन आलेल्या चालकामुळे जिल्ह्यातील दारूबंदी आदेशाचे कसे राजरोस उल्लंघन होते हे वास्तव समोर आले. राजू केशवराव मेश्राम( ५५ , रा. ब्रम्हपुरी जि. चंंद्रपूर) असे त्या मद्यपी चालकाचे नाव आहे. तो ब्रम्हपुरी येथील एका वकिलाकडे चालक म्हणून काम करतो.

एका प्रकरणाच्या निमित्ताने वकिलांना घेऊन तो कुरखेडा न्यायालयात आला होता. वकील आपल्या कामात व्यस्त झाल्यानंतर चालक राजू मेश्राम याने न्यायालय आवारातील वॉटर कुलरमधून बाटलीत पाणी घेतले. त्यानंतर मद्यपान करण्यास सुरुवात केली. याचवेळी न्यायालयातील एक लिपिक त्याठिकाणी गेले असता तेथे तो मद्यपान करताना आढळला.

त्यावर लिपिकाने हटकले असता त्याने अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर लिपिकाने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता खिशात आणखी एक दारूची बाटली आढळून आला. त्यानंतर त्यास वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. उपअधीक्षक रवींद्र भोसले यांनी यास दुजोरा दिला.

अवैध दारूविक्रीची पून्हा एकदा चर्चा

गेल्या तीन दशकापासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. पण ही बंदी केवळ कागदावर असून जिल्हाभरात अवैध दारूविक्री सुरु आहे. पोलीस कारवाईनंतर हे अवैध दारुविक्रेते काही काळ शांत बसतात आणि पुन्हा विक्री सुरु करतात. मागील काही वर्षांपासून कुरखेडा परिसरात अवैध दारू विक्रीने पुन्हा जोर धरला आहे. बुधवारी चक्क न्यायालय परिसरातच दारू पिताना वाहनचालकाला पकडल्यानंतर अवैध दारूविक्रीची पून्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे याविरोधात पोलीस काय भूमिका घेतात याकडे कुरखेडावासियांचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.