Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने अन्...; घराच्या कपाटातील दृश्य पाहून सारेच हादरले, नेमकं काय पाहिलं?

'नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने अन्...; घराच्या कपाटातील दृश्य पाहून सारेच हादरले, नेमकं काय पाहिलं?



साप म्हटले की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यातच तो जर घराच्या अगदी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कपाटात सापडला, तर भीतीने थरकाप उडणे स्वाभाविकच आहे. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे, जिथे घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये एक धूडधांड नाग आरामात बसलेला आढळून आला.


ही धक्कादायक घटना राजस्थानमधील एका शहरातील असून, संबंधित घरात सकाळच्या वेळेस नेहमीप्रमाणे साफसफाई सुरू होती. घरातील एक महिला कपाट साफ करत होती. कपाट उघडल्यानंतर तिने लॉकरचा दरवाजा उघडला आणि तिच्या थरकाप उडाला. लॉकरमध्ये एक मोठा नाग गुंडाळून बसलेला होता. क्षणभर तिला काय करावे काहीच समजले नाही. तिने जोरात किंचाळत घरातील इतर सदस्यांना बोलावले.

सापाबद्दल कळताच घरातील सर्वजण बाहेर पळाले. लगेचच सर्पमित्रांना बोलावण्यात आले. काही वेळातच सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण सावधगिरीने नागाला बाहेर काढले. सुमारे ५ फूट लांबीचा हा नाग असल्याचे समोर आले. तो कोणालाही इजा न पोहोचवता सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आला.

सध्या हा व्हिडिओ(Video इन्स्टाग्रामवरील zarahatke.news या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. सापाचा भितीदायक व्हिडिओ पाहून अनेकांनी तर विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''खुपच भयानक आहे ही घटना'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''आता राव घरात पण भितीच आहे'' अशा असंख्य प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.