Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुम्ही म्हणाल 'शी.. घाण' पण, स्वीडिश प्रौढ मनोरंजन कंपनी कर्मचाऱ्यांना देतंय 30 मिनिटांचा खास ब्रेक, जाणून घ्या कारण

तुम्ही म्हणाल 'शी.. घाण' पण, स्वीडिश प्रौढ मनोरंजन कंपनी कर्मचाऱ्यांना देतंय 30 मिनिटांचा खास ब्रेक, जाणून घ्या कारण
 

स्वीडनमधील एक कंपनी सध्या जगभर चर्चेचा विषय ठरली आहे. या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ऑफिस वेळेत दररोज ३० मिनिटांचा 'हस्तमैथुन ब्रेक' देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, ही संकल्पना एखाद्या मस्करीपुरती मर्यादित न राहता, कंपनीच्या अधिकृत धोरणाचा भाग बनली आहे. कंपनीने स्पष्ट केलं की, हा निर्णय अचानकपणे घेतलेला नाही. या सवलतीमागील उद्देश कर्मचाऱ्यांमधील तणाव कमी करणे, मानसिक आरोग्य सुधारणा करणे आणि कामाच्या ठिकाणी मोकळं वातावरण तयार करणं हा आहे.

२०२२ मध्ये हा ब्रेक कंपनीच्या धोरणात कायमस्वरूपी समाविष्ट करण्यात आला. याआधी २०२१ मध्ये, कोविडच्या काळात वाढलेल्या मानसिक तणावाला उत्तर म्हणून याची चाचणी स्वरूपात सुरूवात करण्यात आली. स्टॉकहोमस्थित या कंपनीमध्ये सध्या ४० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. ही कंपनी इंडिपेंडंट अडल्ट फिल्म्स तयार करते.

कर्मचाऱ्यांनासाठी अधिक आरामदायक वाटावी यासाठी 'द हस्तमैथुन स्टेशन' नावाची खासगी खोली कंपनीने तयार केली आहे. कंपनीचे संस्थापक एरिका लस्टच्या मते, या सवलतीनंतर कंपनीच्या कामाच्या वातावरणात सकारात्मक बदल झाले आहेत. कर्मचारी अधिक प्रसन्न, शांत, लक्ष केंद्रीत आणि सर्जनशील झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. 
 
त्यांच्या म्हणण्यानुसार, हस्तमैथुनसारख्या गोष्टी समाजात खुलेपणाने बोलल्या जाणं गरजेचं आहे. "लैंगिक आरोग्य मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी घट्टपणे जोडलेलं असतं," असं कंपनी म्हणते. म्हणूनच या विषयावर उघडपणे चर्चा होणं आणि त्यासाठी योग्य साधने उपलब्ध असणं गरजेचं आहे. एरिका लस्ट हिच्या कंपनीने घेतलेला निर्णय सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही तिच्या या संकल्पनेवर विचार सुरू केला आहे. एरिकाचा हा अनोखा प्रयोग आता व्हायरल विषय बनला आहे. 'दिवसाला एक कामोत्तेजना डॉक्टरला दूर ठेवते' असं तिने विनोदाने सांगितलंय. कंपनीची ही हटके आणि साहसी संकल्पना अनेकांसाठी विचार करण्यास प्रवृत्त करणारी आहे. कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य आणि वैयक्तिक कल्याण याकडे पाहण्याचा कंपनीचा दृष्टिकोन वेगळा आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.