Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

यंदा 'या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान


 'यंदा 'या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान


ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…चला पाहू रे सोहळा पंढरीचा.. महाराष्ट्रातून लाखो वारकरी, भक्त विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झाले आहे. एकादशी वारकऱ्यांसाठी सण असतो.


विठ्ठल दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूर मध्ये पोहचले आहेत. पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल महापूजा संपन्न झाली. यावेळी मानाच्या वारकऱ्याचा मान पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याला मिळाला. दामू उगले आणि कल्पना उगले हे यंदाचे मानाचे वारकरी ठरले.


गेल्या १२ वर्षांपासून विठ्ठलभक्तीत लीन असलेल्या उगले दाम्पत्याने पहाटे मंदिरात थेट मुख्यमंत्री दांपत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली. पूजेनंतर त्यांचा शासकीय सत्कारही करण्यात आला. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी मानाचा वारकरी नाशिक जिल्ह्यातूनच निवडला गेलाय. विठ्ठलाचं दर्शन रांग बंद करतेवेळी रांगेमध्ये उभे असणार्‍या प्रथम दाम्पत्याला मानाचा वारकरी म्हणून मान मिळतो.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्रविठल रुख्मिणी आराध्य दैवत आहे. पांडुरंगचा आशीर्वाद मिळत राहो. पांडुरंग मनातला ओळखणारा आहे, राज्यावरील पुढची संकटे दूर व्हावीत, बळीराजा सुखी समाधानी व्हावा अशी प्रार्थना करतो.
विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भक्तीचा महापौर लोटला आहे. चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. आज आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास दामू उगले (५२ वर्षे) आणि कल्पना उगले (४८ वर्षे) यांना महापूजा करण्याचा मान मिळाला. कैलास उगले हे शेतकरी असून ते गेल्या बारा वर्षांपासून पंढरपूरला आषाढी वारीसाठी नियमित येतात.

आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्यानिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मोठ्या उत्साहात व चैतन्यमय वातावरणात संपन्न झाली. शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर मानाच्या वारकरी उगले दांपत्य याचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. एक वर्षाचा एस टी पास फ्री या मानाच्या वारकऱ्यांना देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मानाचा वारकरी मिळाला आहे. गतवर्षीही नाशिक जिल्ह्यातीलच मानाचे वारकरी होते. दरम्यान, यंदाच्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरीत १५ लाखाहून अधिक वारकरी, भाविक दाखल झालेत. विठ्ठलाचे दर्शनाची रांग ५ किलोमीटर पर्यंत पोहोचलेय. चंद्रभागेच्या तीरावर स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.