Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'महाराष्ट्रात राहण्याची आवश्यकता नाही, परत या', या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच आवाहन

'महाराष्ट्रात राहण्याची आवश्यकता नाही, परत या', या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच आवाहन
 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी, राज्यात परतण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व प्रवासी मजुरांना सामाजिक सुरक्षेच आश्वासन दिलं आहे. मुंबई, उत्तर प्रदेश, राजस्थानात राहण्याची काही आवश्यकता नाही असं ममता बॅनर्जी या मजुरांना म्हणाल्या.  “मी तुम्हाला ‘पीठा’ किंवा ‘पायेश’ जेवणामध्ये देऊ शकत नाही. पण आम्ही एक चपाती खात असू तर तुम्हाला सुद्धा एक चपाती मिळेल हे सुनिश्चित करु. तुम्ही इथे शांततेत राहू शकता” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. शांतीनिकेतन येथे तृणमूलच्या पहिल्या ‘भाषा आंदोलन’ मार्च आधी त्या बोलल्या की, “तुमच्याकडे पोलीस हेल्पलाइन आहे. आमच्याशी संपर्क साधा. आम्हाला सांगा तुम्हाला कधी परत यायचं आहे. आम्ही तुम्हाला परत आणू”

पश्चिम बंगालमध्ये पुढच्यावर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याआधी भाजप विरोधी आपलं आक्रमक अभियान गतीशील बनवत ‘भाषा आंदोलन’ सुरु केलं. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर मागच्या दरवाजाने NRC लागू करण्याचा कट रचल्याचा आणि बांग्लाभाषी प्रवाश्यांविरोधात 'भाषाई दहशतवाद’ करण्याचा आरोप केला. नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापित केलेलं सांस्कृतिक स्थळ बोलपूरमधून राज्यव्यापी 'बांग्ला भाषा आंदोलना’ ची सुरुवात केली. ‘प्राण देईन, पण मी माझी भाषा सोडणार नाही’ असं त्या म्हणाल्या.

काय आरोप केला?
मतदार यादी संशोधनाच्या आडून बंगाली अस्मिता संपवण्याचा, गरीबांना मतदान अधिकारापासून वंचित ठेवणं किंवा प्रवाशांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नाविरोधात उभं राहण्याचा संकल्प ममता बॅनर्जी यांनी बोलून दाखवला. त्यांनी आरोप केला की, “भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) नेतृत्वाखालील केंद्र सरकार, निवडणूक आयोगासोबत मिलीभगत करुन मतदार यादीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षक नावावर अल्पसंख्यक, अन्य मागास वर्ग, गरीब आणि बांग्ला भाषी मतदारांना टार्गेट करत आहे”
NRC लागू करण्याचा प्रयत्न रोखणार

वैध मतदारांची नाव हटवण्यावरुन त्यांनी निवडणूक आयोगाला आव्हान दिलं. असं काही केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला. तृणमुल काँग्रेस समर्थक आणि राज्यात परतलेले बांग्ला प्रवाशांच्या एका रॅलीच त्या नेतृत्व करत होत्या. “भाषा दहशतवादाच्या नावाखाली आमच अस्तित्व धोक्यात घालण्याचं कारस्थान आणि मागच्या दरवाजाने NRC लागू करण्याचा प्रयत्न रोखणार” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

‘…तर याचे परिणाम भोगावे लागतील’
“जो पर्यंत मी जिवंत आहे, बंगालमध्ये NRC लागू होऊ देणार नाही. मी इथे निरुद्ध शिबिर बनू देणार नाही. जर बंगालमधून नाव हटवण्याचा प्रयत्न केला, तर याचे परिणाम भोगावे लागतील” असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.