महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खांदेपालट झाली आहे महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पोलिस उपआयुक्त दर्जाच्या राज्यातील २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पुणे,मुंबईसह इतर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी पोलीस दलात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहे. पुण्याच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस
आयुक्त गणेश इंगळे यांची पदोन्नती झाली आहे. गणेश इंगळे यांची अमली पदार्थ
विरोधी टास्क फोर्स याठिकाणी पोलीस उपायुक्त म्हणून पदोन्नती झाली. तर
विजय लगारे यांची मुंबईत पोलिसांत उपयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.
कुठल्या अधिकाऱ्याची कुठे बदली?
विजय लगारे: पोलीस उपआयुक्त मुंबईगणेश इंगळे: अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणेकृष्णात पिंगळे: अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणेमंगेश चव्हाण: अपर पोलिस अधीक्षक, लातूरअभिजीत धाराशिवकर: पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूरपद्मजा चव्हाण: समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, अहिल्यानगरविजय कबाडे: पोलीस उपायुक्त नागपूर शहर (विद्यमान पदावर एक वर्ष मुदत वाढ)योगेश चव्हाण: उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबईअशोक थोरात: अप्पर पोलीस अधीक्षक, यवतमाळअमोल झेंडे: दक्षता अधिकारी, पुणे महानगर विकास प्राधिकरणदीपक देवराज: पोलिस अधीक्षक, नागरी संरक्षण हक्क ठाणे शहर (विद्यमान पदावर एक वर्ष मुदतवाढ)सागर पाटील: सहाय्यक पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबईस्मिता पाटील: पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ मुंबईजयंत बजबळे: पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण ठाणे शहरसुनील लांजेवार: पोलीस उपआयुक्त, राज्य गुप्त वार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगरजयश्री गायकवाड: पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूररत्नाकर नवले: पोलिस उपआयुक्त, छत्रपती संभाजीनगर शहरप्रशांत बच्छाव: पोलिस अधीक्ष, कनागरी हक्क संरक्षण विभाग नाशिकनम्रता पाटील: पोलिस उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग पुणेअमोल गायकवाड: अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणापियुष जगताप: समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, चंद्रपूरबजरंग बनसोडे: पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, छत्रपती संभाजी नगरज्योती क्षीरसागर: पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण विभाग, कोल्हापूरसोमनाथ वाघचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.