हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, पगार २.८ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?
सरकारी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी नोकरी करण्याच ही उत्तम संधी आहे.
एचपीसीएलमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, मेकॅनिकल इंजिनियर, केमिकल इंजिनियर, सीए आणि ऑफिसर अशा विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
एचपीसीएलमध्ये (HPCL) ३०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया याआधीच सुरु झाली आहे. १ जूनपासून अर्ज करता येत आहेत. या नोकरीसाठी फ्रेशर्ससाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून होती. त्यामुळे आता फ्रेशर्स अर्ज करु शकणार नाहीयेत. अनुभवी उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२५ आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीत पहू शकणार आहात.
हिंदुस्तान पेट्रोलियममधील या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. तुमच्याकडे कोणत्याही विषयातील पदवी असणे आवश्यक आहे.याचसोबत इंजिनियरिंग डिप्लोमा, मेकॅनिकल इंजिनियरिंग, सिव्हिल इंजिनियर, सीए, एचआर अशा पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
या नोकरीसाठी तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे. हा पगार पदानुसार आणि अनुभवानुसार वेगवेगळा असणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ५०,००० ते २,८०,००० रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे.
भरतीप्रक्रिया
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, लेखी परीक्षा, NET स्कोअर, टायपिंग टेस्ट, ग्रुप डिस्कशन, स्किल टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.