Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा पगार मिळणार नाही !

तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा पगार मिळणार नाही !
 

महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात आहे. यामुळे जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी राज्य सरकारी कर्मचारी म्हणून सेवा बजावत असेल तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे.
 
खरेतर, राज्य शासनाच्या काही विभागांमधील कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रक काढण्यात आले आहे, या परिपत्रकानुसार जे कर्मचारी आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून आपली उपस्थिती दर्ज करणार नाहीत त्यांना त्यांचे वेतन मिळणार नाही. आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती दर्ज न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन मिळणार नाही अशा पद्धतीचे परिपत्रक काही विभागांकडून जारी करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.


काय आहेत डिटेल्स ?
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, भारत वर्षातील सर्वच सरकारी आस्थापनामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी आता एक नवीन प्रणाली वापरली जात आहे. ही नवीन प्रणाली आधार बेस प्रणाली आहे. या सदरील आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना सकाळी ऑफिसमध्ये येताना IN आणि सायंकाळी सुट्टीच्या वेळी OUT करणे आवश्यक आहे. दरम्यान, आता याच पार्श्वभूमीवर राज्य शासनातील काही विभागांकडून परिपत्रक जारी करत आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून जे कर्मचारी आपली उपस्थिती लावणार नाहीत त्यांना जुलै महिन्याचे वेतन मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एक जुलै 2025 पासून कर्मचाऱ्यांना आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून हजेरी लावावी लागणार आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांकडून राज्यातील काही भागांमध्ये अजूनही नेटवर्कची समस्या आहे म्हणून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती दर्ज करताना अडचणी येत असल्याची बाबही निदर्शनास आणून दिली जात आहे. आधार बेस प्रणाली नक्कीच फायद्याची ठरणार आहे पण ही प्रणाली ज्या ठिकाणी नेटवर्क नाही, त्या ठिकाणी सपशेल फोल ठरते यामुळे ज्या ठिकाणी नेटवर्कची समस्या तेथील कर्मचाऱ्यांसाठी काय उपाययोजना केल्या जातील हे पाहणे आता उत्सुकतेचे राहणार आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.