महाराष्ट्राच्या नागपूरची दिव्या देशमुखने २०२५ च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार विजय मिळवला आहे. दिव्याने वयाच्या 19व्या वर्षी इतिहास रचला आहे. जॉर्जियामधील बटुमी येथे झालेल्या FIDE महिला विश्वचषक स्पर्धेत दिव्याने भारतासाठी बुद्धिबळाच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण लिहिला आहे. विश्वचषक स्पर्धेत अजिंक्यपद
मिळवल्यानंतर दिव्याावर पैशांचा वर्षाव झाला आहे. या स्पर्धेत वर्ल्ड
चॅम्पियन दिव्या आणि उपविजेत्या कोनेरू हम्पीला देखील बक्षीसाची रक्कम
मिळाली आहे.
दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी या दोघांचे मागील दोन सामने ड्रॉ झाले. दोघांमधील मूळ सामना १-१ गुणांनी बरोबरीत राहिला होता. तर रॅपिड राऊंडमध्ये दिव्या देशमुखने पहिल्या गेममध्ये आक्रमक खेळत कोनेरू हम्पीशी बरोबरी साधली. त्यानंतर रॅपिड राऊंडच्या दुसऱ्या गेममध्ये दिव्याने वर्चस्व गाजवत कोनेरुचा पराभव केला. FIDE महिला विश्वचषक २०२५च्या अंतिम
सामन्यात दिव्याने बाजी मारत ४२ लाख रुपये जिंकले. तर उपविजेत्या कोनेरु
हम्पीला ३० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. या दोघींनी आता
कॅन्डिडेट्स' स्पर्धेसाठीही पात्रता मिळवली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून दिव्याचं कौतुक
विजेत्या दिव्या देशमुखचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अतिशय आनंद आहे की दिव्या ही नागपूरची आहे. महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या जागतिक स्पर्धेत अजिंक्यपद प्राप्त केलं आहे. तिने स्पर्धा जिंकलेली आहे. तसेच ग्रँडमास्टरचा किताब देखील या ठिकाणी प्राप्त केला आहे'.'खरं म्हणजे किशोरवयीन अशी पहिली खेळाडू आहे, जिने महत्त्वाच्या चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. दुसऱ्यांदा तिने त्यामध्ये भाग घेतला. यापूर्वीही तिने भारताकरिता अनेक मेडल जिंकले आहेत. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी तिने केली आहे. 23 गोल्ड मेडल जिंकले आहेत. त्यामुळे अतिशय होतकरू खेळाडू म्हणून पण तिच्याकडे पाहू शकतो, असे फडणवीसांनी म्हटलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोनेरू हम्पी यांचंही अभिनंदन केलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.