Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित

काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित
 

सांगली : काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. मुंबईत मंगळवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा होणार आहे. दरम्यान, माजी मंत्री अण्णा डांगे बुधवारी मुंबईत प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पृथ्वीराज पाटील हे भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा विधानसभा निवडणुकीपासून सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत ते सांगलीतून भाजपचे उमेदवार असणार, अशी चर्चाही खूप रंगली होती. मात्र आमदार सुधीर गाडगीळ यांनाच भाजपने तिसर्‍यांदा उमेदवारी दिली. पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली.

मात्र जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली होती. दरम्यान, काँग्रेसमधून प्रस्थापितांचा आपणाला नेहमीच विरोध राहणार, अशी पक्की धारणा झाल्याने पृथ्वीराज पाटील पुन्हा भाजपच्या संपर्कात गेले. त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. ते मंगळवारी मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. भाजप प्रवेश केव्हा होणार, हे या बैठकीत निश्चित होईल, अशी चर्चा आहे. पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत कवठेमहांकाळमधील काँग्रेस नेते बाळासाहेब गुरव यांचाही भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.