सांगली : संततधार पावसाबरोबरच पुराचे पाणी आल्याने जिल्ह्यातील 31 मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामध्ये सात राज्यमार्ग तर पंधरा जिल्हा मार्ग, 8 ग्रामीण आणि एक इतर मार्गाचा समावेश आहे. जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. शिराळा तालुक्यातील कांदे- मांगले रस्त्यावरील मोरणा नदी पुलावर सोमवारी दुपारपासून पाणी आल्याने हा राज्यमार्ग बंद करण्यात आला आहे. कडेगाव तालुक्यातील पुसेसावळी, कडेपूर, वांगी, कुंडल मार्गावरील आमणापूर मार्गावर मंगळवारी सकाळी पाणी आले. त्याचबरोबर बुर्ली-आमणापूर रस्ताही पाण्याखाली गेला आहे. तासगाव तालुक्यातील सावर्डे ते भवानी मंदिरमार्गे मणेराजुरीला जाणारा रस्ता, जुना सातारा ते तासगाव राष्ट्रीय महामार्गकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द ते नागावला जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे.
कडेगाव तालुक्यातील कळंबी-भाळवणी रस्त्यावर पाणी आले आहे. सांगली परिसरातील सावळीवाडी ते समडोळी, सांगलीवाडी रस्ता, दुधगाव ते कसबे डिग्रज, कर्नाळ रस्ता, कसबे डिग्रज ते मौजे डिग्रज रस्ता पाण्याखाली गेला आहे. पलूस तालुक्यातील उरुण इस्लामपूर, नवेखेड, जुनेखेड, पुणदी रस्त्यावर पाणी आले आहे. पुणदी, नागराळे, बुर्ली, आमणापूर रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर बुर्ली ते चौगुलेनगर ओढ्यावर पाणी आल्याने हा रस्ता सोमवारपासून वाहतुकीला बंद करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.