Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! महादेवी हत्तीणी परत येणार? खासदारानं कोल्हापूरकरांना दिली आनंदाची बातमी

Big Breaking! महादेवी हत्तीणी परत येणार? खासदारानं कोल्हापूरकरांना दिली आनंदाची बातमी
 

महादेवी हत्तीणीवर कोल्हापूरमधील वातावरण तापलंय. येथील मठातील हत्तीणी वनतारा अभयारण्यात पाठवण्यात आल्यानं येथील नागरिक संतापले आहेत. नांदणी येथील महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आज सकाळपासून नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत आत्मक्लेष पदयात्रा काढण्यात आलीय. ही पदयात्रा स्वाभीमानीचे राजू शेट्टी यांच्या नेतृ्त्वात काढण्यात आलीय. त्याचदरम्यान खासदार धैर्यशील माने यांनी हत्तीणींबाबत मोठी दिलासादायक बातमी दिलीय.

'महादेवी' हत्तीणीबाबत लवकरच आनंदाची बातमी मिळेल, असं विधान करत खासदार धैर्यशील माने यांनी आनंदाची बातमी दिलीय. आज कोल्हापुरकरांनी काढलेल्या पदयात्रेत खासदार धैर्यशील माने, आमदार अशोक माने आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांना आंदोलकांच्या संतापाचा सामना कारावा लागला. आत्मकलेश पदयात्रेत सहभागी न होता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला. मात्र त्यावेळी त्यांनी कोल्हापुरकरांना आनंदाची बातमी दिली.

माध्यमांशी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले की, पेटाने वातावरण पेटू नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. पेटाने घेतलेल्या भूमिकेमुळे संशय व्यक्त केला जातोय. पेटाने वनतारा संग्रहालयाचे नाव सुचवल्याने गोंधळ उडालाय. पेटाने यांत्रिक हत्ती देतो असं म्हणत या विषयाची चेष्टा करू नये, असं खासदार माने म्हणालेत.

दरम्यान नंदिनी मठातील महादेवी हत्तीणी वनतारा अभयारण्यात नेण्यात आल्यानं कोल्हापूरकर संतापले आहेत. त्यामुळे रिलायन्स जिओवर बहिष्कार टाकत कोल्हापुरातील ७०० पेक्षा जास्त गावातील लोकांनी जिओ सिम पोर्ट करण्यास सुरुवात केलीय. आज काढलेल्या पत्रयात्रेत काही ग्रामस्थांनी आपल्या देवाऱ्यातील सोन्याचा हत्ती आणलाय. घरातील देवऱ्यात असणाऱ्या सोन्याच्या हत्तींना डोक्यावर घेऊन ते पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. महादेवी हत्तीणीदेखील सोन्यासारखी हत्तीणी आहे. त्यामुळे आमची महादेवी आम्हाला परत करा, अशी मागणी या ग्रामस्थांकडून होत आहे.

मठातील हत्तीनी वनतारा येथे पाठवण्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी गंभीर आरोप केलाय. पेटा संघटनेच्या तक्रारीवरून महादेवी हत्तीला गुजरातच्या वनताराला पाठवण्यात आले आहे. हा सर्व षडयंत्राचा भाग होता, असा आरोप त्यांनी केला. त्यासाठी आत्मक्लेष पदयात्रा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देणार असल्याचे शेट्टी म्हणालेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.