Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्वयंपाक करताना 'या' तेलांचा वापर करू नका, आरोग्यावर होईल वाईट परिणाम

स्वयंपाक करताना 'या' तेलांचा वापर करू नका, आरोग्यावर होईल वाईट परिणाम
 

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आजकाल लोकं फिटनेसबद्दल खूप जागरूक होत आहेत. अशातच फिट राहण्यासाठी अनेकदा लोकं सोशल मीडियावर जे काही उपाय दाखवले जातात ते हेल्दी मानतात. कारण सोशल मीडियावर फिटनेस बद्दल अनेक वेगवेगळे उपाय सांगितले जातात, ज्यांचा अवलंब काहीजण करत असतात. अशातच सोशल मिडियावर फिट राहण्यासाठी आहारात रिफाइंड तेल वापरणे करू नये असे सांगितले जाते, जे खरे आहे. त्यामुळे अनेक लोकं जेवण बनवताना रिफाइंड तेल न वापरता ऑलिव्ह ऑइल, सूर्यफूल तेल इत्यादी इतर तेलांचा वापर करत आहेत.

पण तुम्हाला माहित आहे का की बाजारात उपलब्ध असलेल्या काही तेलांचा वापर स्वयंपाकासाठी करणे हानिकारक आहे. कारण बाजारात मिळणाऱ्या तेलांमध्ये प्रक्रिये दरम्यान त्यांचे नैसर्गिक पोषक घटक कमी होतात आणि शरीरासाठी अशा तेलांचा वापर हानिकारक ठरू शकतात. उच्च उष्णता प्रक्रिया, रिफाइंड करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत आणि ट्रान्स फॅटची उपस्थिती अशी तेलं तुमच्या शरीरातील हृदय, यकृत, पचन आणि रक्तदाबासाठी धोकादायक ठरते. आज आम्ही तुम्हाला अशा 5 तेलांबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही तुमच्या स्वयंपाकात चुकूनही वापरू नये.

सूर्यफूल तेल

आजकाल अनेकजण सूर्यफूल तेल आरोग्यदायी आहे असे समजून या तेलाचा वापर स्वयंपाक करतात. परंतु यात तेलात ओमेगा-6 फॅट भरपूर प्रमाणात असते. हे तेल जास्त उष्णतेवर ऑक्सिडायझेशन होते आणि हानिकारक मुक्त रॅडिकल्स सोडते, ज्यामुळे शरीरात पेशींचे नुकसान आणि वयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. जास्त प्रमाणात सेवन केल्याने जळजळ वाढू शकते.

सोयाबीन तेल
सोयाबीन तेल सामान्यतः भारतीय स्वयंपाकघरांमध्ये वापरले जाते, परंतु हे तेल जास्त रिफाइंड केलेले असते. त्यात असलेल्या ओमेगा-6 फॅटी ॲसिडचे जास्त सेवन केल्याने शरीरात जळजळ वाढू शकते, ज्यामुळे हृदयरोग, मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो.
कॅनोआ तेल

कॅनोआ तेलाला अनेकदा आरोग्यदायी म्हटले जाते, परंतु प्रक्रियेदरम्यान ते हायड्रोजनेशन केले जाते, ज्यामुळे ट्रान्स फॅट्स तयार होतात. ट्रान्स फॅट्स हे कोलेस्टेरॉल असंतुलन, हृदयरोग आणि चयापचय विकारांचे एक प्रमुख कारण आहे.

पाम तेल
हे तेल स्वस्त असल्याने पॅकेज्ड आणि प्रक्रिया केलेल्या अन्नात सर्वाधिक वापरले जाते, परंतु त्यात असलेले सॅच्युरेटेड फॅट तुमच्या धमन्या ब्लॉक करू शकते. त्याचे सतत सेवन केल्याने कोलेस्टेरॉल वाढते आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो.
कॉर्न ऑइल

कॉर्न ऑइल म्हणजेच मक्याच्या तेलामध्ये ओमेगा-6 देखील भरपूर प्रमाणात असते आणि त्याच्या प्रक्रियेदरम्यान रासायनिक सॉल्व्हेंट्सचा वापर केला जातो. हे तेल वजन वाढणे, जळजळ आणि मधुमेह यासारख्या समस्यांना प्रोत्साहन देते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.