Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जरांगेंच्या आंदोलनाविरोधात प्रकाश आंबेडकर मैदानात ? जरांगे यांच्यावर केले 'हे' गंभीर आरोप

जरांगेंच्या आंदोलनाविरोधात प्रकाश आंबेडकर मैदानात ? जरांगे यांच्यावर केले 'हे' गंभीर आरोप
 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा महायुती सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील आझाद मैदानात हे आंदोलन होणार असून, राज्यातील सर्व मराठा बांधवांनी मुंबईत यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर  यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडिया पोस्ट करत प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांना काही सवाल केले आहेत. गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका, अशी देखील टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकर म्हणाले, 'मनोज जरांगे पाटील,  तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत. अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असतांना सत्तेत सर्व प्रस्थापित मराठा नेते होते. शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे सर्व प्रस्थापित मराठे सत्तेत होते.

तुम्ही निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान केले. तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात पण, गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात. गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का? असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.