प्रसिद्ध खेळाडू होणार ठाकरेंचा जावई! साखरपुडा उरकला लग्न व्हॅलेंटाइन्सला; म्हणाला, 'डेट करताना ती राजकारण्याची...'
तो प्रसिद्ध अंतरराष्ट्रीय खेळाडू, ती एका नामवंत राजकीय घरण्यातील मुलगी, दोघेही इन्स्टाग्रामवर भेटले, बोलू लागले, प्रेमात पडले अन् आता घरच्यांच्या सहमतीने साखरपुडा झाला. येत्या व्हॅलेंटाइन्स डेला दोघेही विवाह बंधनात अडकणार आहे. एखाद्या चित्रपटाची स्टोरी वाटावी अशी गोष्ट घडलीये नागपूरमध्ये... हे दोघे कोण आहेत आणि या नात्याबद्दल त्यांनी काय म्हटलंय जाणून घेऊयात.
युवराजने दिली माहिती
ज्या प्रसिद्ध खेळाडूबद्दल आपण बोलतोय तो आहे, भारताचा माजी हॉकीपट्टू युवराज वाल्मिकी! युवराजचा नागपूरचे काँग्रेस नेते विकास ठाकरे यांची कन्या वीहा ठाकरेसोबत साखरपुडा पार पडला आहे. या खास सोहळ्याला दोन्ही कुटुंबियांकडून अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक उपस्थित होते. शनिवार या दोघांचा साखरपुडा पार पडल्याची माहिती स्वत: युवराजने त्याच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन दिली आहे.
शनिवारी म्हणजेच 16 तारखेला पार पडलेल्या या सोहळ्याचा फोटो युवराजने 18 ऑगस्ट रोजी आपल्या एक्स अकाऊंटवरुन शेअर केला. त्यानंतर युवराजने स्थानिक वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला याबाबतची माहिती दिली. यावेळी युवराजने विकास ठाकरे यांच्या लेकीसोबत भेट कशी झाली? याची माहिती दिली. माझी आणि वीहाची भेट इंस्टाग्रामवरवरुन झाली. आम्ही आम्ही दोघे इंस्टाग्रामवर खूप बोलायचो. पाहता क्षणी आम्ही एकमेकांना पसंत केलं होतं असे युवराजने सांगितलं. वीहाला डेट करत असताना ती एका नामवंत राजकीय कुटुंबातील मुलगी असल्याची कल्पना आपल्याला नव्हती असंही युवराजने कबुल केलं. दोघांनी भेटण्यासंदर्भात चर्चा सुरु केली तेव्हा वीहाने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर युवराजला ती कोण आहे हे समजलं.
ती राजकारण्याची मुलगी आहे कल्पना नव्हती
आम्ही इन्स्ट्ग्रामवरुन एकमेकांशी खूप गप्पा मारायचो पण मला कधीच कळलं नाही की ती राज्यातील इतक्या मोठ्या राजकीय नेत्याची मुलगी आहे. एकदा मी तिला भेटायला बोलावले तेव्हा तिने सुरक्षेचे कारण पुढे केले होते. त्यावेळेस तिने मला सांगितले होते की ती आमदार ठाकरे यांची लेक आहे. ते ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला होता, असं युवराजने सांगितलं.भारतीय हॉकी संघाचा स्ट्रायकर म्हणून युवराज वाल्मिकीला आजही ओळखलं जातं. त्याने 50 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. युवराजने 2014 मध्ये नेदरलँडसमध्ये झालेल्या हॉकी विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच 2011 मध्ये ऑर्डोस येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघात तो होता.
धनराज पिल्लेही होते उपस्थित
साखरपुड्याच्या सोहळ्याला युवराजचा भाऊ, आंतरराष्ट्रीय हॉकीपट्टू देविंदर आणि त्याचा मार्गदर्शक दिग्गज धनराज पिल्ले उपस्थित होते. युवराज आणि वीहा येत्या 14 फेब्रुवारी 2026 म्हणजे वेलेंटाईन डेला लग्नबंधनात अडकणार आहे.
साखरपुडा कधी आणि कुठे झाला?
युवराज वाल्मिकी आणि वीहा ठाकरे यांचा साखरपुडा शनिवारी, 16 ऑगस्ट 2025 रोजी नागपूर येथे पार पडला. हा सोहळा खासगी स्वरूपाचा होता आणि दोन्ही कुटुंबांतील मोजक्याच व्यक्ती उपस्थित होत्या.
युवराज वाल्मिकी आणि वीहा ठाकरे यांची भेट कशी झाली?
युवराज आणि वीहा यांची भेट इन्स्टाग्रामवर झाली. त्यांनी तिथे गप्पा मारण्यास सुरुवात केली, एकमेकांना पसंत केले आणि हळूहळू त्यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले.
युवराजला वीहा कोण आहे हे कधी समजले?
युवराजला सुरुवातीला वीहा ही काँग्रेस नेते आणि आमदार विकास ठाकरे यांची मुलगी आहे याची कल्पना नव्हती. जेव्हा त्यांनी भेटण्याची योजना आखली, तेव्हा वीहाने सुरक्षेचे कारण सांगितले आणि ती विकास ठाकरे यांची मुलगी असल्याचे समजले, तेव्हा युवराजला आश्चर्याचा धक्का बसला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.