Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

२० कोटी लोकसंख्या असलेल्या समाज अल्पसंख्याक कसा?; गोपीचंद पडळकर

२० कोटी लोकसंख्या असलेल्या समाज अल्पसंख्याक कसा?; गोपीचंद पडळकर
 

यवत : वीस कोटी लोकसंख्या असलेला समाज अल्पसंख्याक असा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी यवत येथील जनआक्रोश मोर्चात उपस्थित केला. यवत स्टेशन येथील निळकंठेश्वर मंदिरात असलेल्या अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची समाजकंटकाने विटंबना केल्याच्या निषेधार्थ यवत येथे हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

संपूर्ण तालुका बंद ठेवत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत हिंदू जन आक्रोश मोर्चाकरांनी यवत परिसर दणाणून सोडला. यावेळी वैष्णव किन्नर आखाडा प्रमुख स्वामी हेमांगी सखीजी, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप यांनी मोर्चाकरांना संबोधित केली.

यावेळी रसिका वरुडकर यांनी आरोपी ३ दिवसापूर्वी जमातीत जाऊन आला होता या घटनेचा खरा मास्टर माईंड कोण असा तपास करावा, २६/११ चा अतिरेखी यवत येथील मस्जिद मध्ये राहिला होता, गुऱ्हाळ कामगाराचा नावाखाली हत्यारे पुरवले जातात असा आरोप केला. हिंदू समाजाच्या बाबत अशा काही घटना घडल्या तर पोट भरणारी टाळी समाजासाठी वाजणार असा शब्द देत सई नगरकर यांनी तृतीय समाजाच्या वतीने निषेध केला.

यावेळी संग्राम जगताप यांनी ऍक्शन ला रिएक्शन ताबडतोब यायला हवी होती, पोलिसांनी जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर केल्याशिवाय राहत नाही पोलिसांनी तीन तीन चार चार दिवस आरोपीला शोधण्यासाठी लागणे ही गोष्ट खाकी वर्दीला शोभत नाही हिंदू समाजाने जागृत राहणे हे फार महत्त्वाचे असून कश्मीर मधील मतदार हैदराबाद मतदान करतात तसे आपल्या भागात देखील डुबलीकेट रेशन कार्ड, बाहेरील मतदान होणार नाही यासाठी सर्वांनी जागृत राहणे गरजेचे आहे, महाराष्ट्रात लव जिहाद व लँड जिहाद हे दोन कायदे लवकरात लवकर अंमलात आणावा अशी मागणी करत पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतला अशी माहिती मिळाली परंतु आरोपी व घटना बाबतची संपूर्ण माहिती महाराष्ट्राच्या जनतेला कळवली पाहिजे व अशा जिहादी प्रवृत्तीला पाय बंद घाला असे आवाहन पोलिस प्रशासनाला केले.

अनधिकृत मस्जिद तयार होती कशी, याला परवानगी देते कोण, निधी उपलब्ध होतो कुठून, हे लोक भू माफिया आहेत, आम्ही अर्धनारीश्वराचे रुप असून वेळप्रसंगी तांडव करण्यासाठी आम्ही तयार आहोत, रात्री मस्जिद मध्ये मुस्लिम लोक एकत्र होऊन कोणते षडयंत्र रचत आहेत याची तपासणी करून यावर कारवाई केली पाहिजे, जमातीत राहून येणारा मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करतो त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका मांडत वैष्णव किन्नर आखाडा प्रमुख स्वामी हेमांगी सखीजी यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

जे पुरोगामी इतर वेळेस लोकांना ज्ञान सांगतात , स्वतःच्या राजकारणासाठी महाराजांचे नाव घेतात ते पुरोगामी आज कुठे गेले असा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या जिहाद्याचा चौरंग केला पाहिजे , या पाठीमागे मोठे षडयंत्र असून प्रशासनाने मुळापाशी जाऊन अशा व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करावी.

२० कोटी लोकसंख्या असून देखील अल्पसंख्यांक असा असा प्रश्न उपस्थित करत हिंदू धर्मासाठी सर्वांनी संवेदनशील राहिले पाहिजे अशी अपेक्षा आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली तर लव जिहाद व धर्मांतर बंदी बाबत कडक कायदा करावा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. यावेळी गणेश आखाडे, प्रवीण परदेशी, दीपा गुरु रंजिता नायक यांसह अनेकांनी घटनेचा निषेध व्यक्त केला . पुणे, अहिल्यानगर, नाशिकसह अनेक जिल्ह्यातील हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.