सैन्यदलातील अधिकाऱ्याचा राडा! विमानतळावरील कर्मचाऱ्यांना मारहाण; एकाचा पाठीचा कणा तुटला, दुसऱ्याचा जबडा फाटला
सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक प्रवासी स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करत असल्याचे पाहायला मिळते. ही घटना श्रीनगर विमानतळावर घडली आहे. श्रीनगरहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइट
क्रमांत SG-386 च्या बोर्डिंग गेटवर प्रवाश्याने कर्मचाऱ्यांना
लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात एका कर्मचाऱ्याचा पाठीचा कणा तुटला आणि
एकाच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली.
स्पाइसजेटने दिलेल्या माहितीनुसार, रागात प्रवाशाने विमानतळावरील स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यात कर्मचाऱ्यांना मोठी दुखापत झाला. एक कर्मचारी जमिनीवर बेशुद्ध पडला. बेशुद्ध अवस्थेमध्येही त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण होत राहिली. बेशुद्ध कर्मचाऱ्याला मदत करण्यासाठी खाली वाकलेल्या एका व्यक्तीच्या जबड्यावर लाथ मारण्यात आली. यामुळे त्याच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव होऊ लागला. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करणारी व्यक्ती हा सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी आहे. हा प्रवासी दोन केबिन बॅग घेऊन जात होता, या बॅग्सचे वजन १६ किलो होते. सर्वसाधारणपणे सामान घेऊन जाण्याची मर्यादा ७ किलो इतकी आहे. अतिरिक्त सामनासाठी अधिक शुल्क लागणार असल्याचे सांगण्यात आले. पण त्या व्यक्तीने शुल्क भरण्यास नकार दिला. बोर्डंग प्रक्रिया पूर्ण न करता त्याने विमान सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले. सुरक्षारक्षकांनी त्याला गेटवर नेले. तेथे गेल्यावर प्रवाशाने ग्राउंट स्टाफच्या चार कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक नियमांनुसार, प्रवाशाला नो फ्लाइट यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. स्पाइसजेटने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून कर्मचाऱ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची माहिती दिली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.