आजकाल स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण बॅटरी लवकर संपते, ही सर्वांचीच तक्रार! काही साध्या सवयी आणि युक्त्या वापरून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी दीर्घकाळ टिकवू शकता.
जाणून घेऊया काही उपयुक्त टिप्स
सगळ्यात पहिले बॅटरी चार्जिंगच्या सवयी
सुधारा. तज्ज्ञ सांगतात की, बॅटरी 20% ते 80% च्या दरम्यान ठेवणे आदर्श
आहे. रात्रभर चार्जिंग टाळा कारण यामुळे बॅटरीवर ताण येऊन बॅटरीचे आयुष्य
कमी होऊ शकते. फास्ट चार्जिंगचा वापर फक्त गरज असेल तेव्हाच करा. रोजच्या
वापरासाठी सामान्य चार्जर वापरणे बॅटरीसाठी फायदेशीर आहे. दुसरी गोष्ट
म्हणजे बॅटरी सेव्हर मोडचा वापर. बहुतेक स्मार्टफोन्समध्ये हा पर्याय
उपलब्ध असतो. यामुळे स्क्रीनची चमक कमी होते, बॅकग्राऊंड प्रक्रिया
मर्यादित होतात आणि बॅटरीचा वापर कमी होतो.
प्रवासात किंवा वीज खंडित झाल्यास हा मोड अतिशय उपयुक्त आहे. अँड्रॉइडवर सेटिंग्जमधील 'बॅटरी' पर्यायात आणि आयफोनवर 'लो पॉवर मोड' सुरू करा. बॅकग्राऊंड अॅप्सवर नियंत्रण ठेवा. सोशल मीडिया, नकाशे किंवा शॉपिंग अॅप्स बॅकग्राऊंडमध्ये चालत राहतात आणि बॅटरी खर्च करतात. सेटिंग्जमधून अशा अॅप्सचा बॅकग्राऊंड वापर बंद करा. तसेच ईमेल, क्लाऊड स्टोरेज किंवा मेसेजिंग अॅप्सचे ऑटो सिंक बंद केल्यास बॅटरी वाचेल. स्क्रीन आणि कनेक्टिव्हिटीवर लक्ष द्या. स्मार्टफोनचा डिस्प्ले सर्वाधिक बॅटरी खर्च करतो.स्क्रीन ब्राइटनेस कमी करा, अॅडॅप्टिव्ह ब्राइटनेस सुरू करा आणि स्क्रीन टाइमआउट कमी ठेवा. AMOLED डिस्प्ले असल्यास डार्क मोड वापरा. ब्लूटूथ, वायफाय, GPS आणि मोबाइल डेटा गरज नसताना बंद करा. कमी सिग्नल असलेल्या ठिकाणी एअरप्लेन मोड वापरल्यास बॅटरी वाचेल. शेवटी, सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा. या सोप्या टिप्स फॉलो करा आणि मोबाईलचे चार्जिंग टिकवा
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.