'आजी मला तिथे दुखतंय', 4 वर्षाच्या नातीची तक्रार, डॉक्टरांकडे गेले असता कुटुंब हादरलं; गोरेगावच्या प्रसिद्ध शाळेतील प्रकार
गोरेगावमध्ये चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने आजीकडे शरिरातील एका विशिष्ट ठिकाणी वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर कुटुंबाने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली. यानंतर कुटुंबाच्या पायाखालची जमीनच
सरकली. कारण मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं. यानंतर कुटुंबाने
पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी पॉक्सोअंतर्गंत
गुन्हा दाखल करत शाळेतील 40 वर्षीय महिला कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
दिंडोशी येथील शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं असता
आरोपीला 19 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
गोरेगाव (पश्चिम) येथील लिंक रोडवरील एका प्रसिद्ध शाळेत चार वर्षांच्या मुलीवर 16 सप्टेंबर रोजी लैंगिक छळ झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची आजी तिला शाळेत नेत आणि शाळेतून घऱी आणत असे. 16 सप्टेंबरला शाळेतून परतल्यानंतर आजी नातीचे कपडे बदलत होती. यावेळी मुलीने शरिराच्या एका भागात वेदना होत असल्याची तक्रार केली.मुलीला वेदना होत असल्याने कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात नेलं. तसंच शाळेच्या मुख्याध्यापकांनी याबाबत कळवलं होतं. वैद्यकीय तपासणी केली असता, मुलीवर लैंगिक छळ झाल्याचं उघड झालं. यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पॉस्को (लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि एका महिला सहाय्यक कर्मचारी सदस्याला अटक केली असून, तीन महिला सहाय्यक कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. पोलिसांनी आम्ही सीसीटीव्ही तपासत असल्याचं सांगितलं आहे. तसंच पुढील तपास सुरु आहे. दरम्यान आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने आरोपीला 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.