मुंबई उच्च न्यायलयात सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायलयात स्वयंपाकी-नि-शिपाई पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या नोकरीसाठी इच्छुरांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. मुंबई हाय कोर्टाच्या मूख्य शाखेच्या
आस्थापनेवरील पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही
ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.२१ सप्टेंबर अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख
आहे.
शैक्षणिक पात्रता :
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ७वी/१०वी / १२वी पास असणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी सातवी पास असावे. उमेदवाराला मराठी भाषा लिहता, बोलता आणि वाचता यावी. तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ३०० रुपय शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला १६,६०० ते ५२,४०० रुपये पगार मिळणार आहे. या भरतीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.निवड पद्धत : मुंबई उच्च न्यायालयातील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा आणि शारीरिक क्षमता चाचणीद्वारे केली जाणार आहे. यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर उमेदवाराची निवड केली जाईल.
अर्ज कुठे पाठवाल?
तुम्हाला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. २१ सप्टेंबर अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे. मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला,P.W.D इमारत, फोर्ट, मुंबई ४०००३२ येथे अर्ज पाठवायचा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.