Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का? उद्धव ठाकरेंचं बळ चांगलंच वाढणार, त्या नेत्यांनी.

Big Breaking! एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का? उद्धव ठाकरेंचं बळ चांगलंच वाढणार, त्या नेत्यांनी.

राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक केंद्रस्थानी असणार आहे. ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपा, शिवसेनेचे दोन्ही गट ताकदीने काम करत आहेत.

गेल्या काही दिवसांत ठाकरेंकडे असणारे काही माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले होते. आता हेच नगरसेवक पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी काळात हे माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे आले तर शिंदेंसाठी ऐन निवडणुकीच्या काळात हो मोठा फटका असू शकतो.

नेमकी काय माहिती समोर आली?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले 15 नगरसेवक पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतण्याची शक्यता आहे. यात कोणकोणत्या माजी नगरसेवकांचा समावेश आहे, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. मात्र तब्बल 15 माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंना पुन्हा येऊन मिळणार असतील, तर मुंबईत ठाकरेंची ताकद चांगलीच वाढणार आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांची मनसेशी युती करण्यासाठी बोलणी चालू आहे. असे असतानाच आता ठाकरेंचे शिंदेंना मिळालेले 15 नगरसेवक परत ठाकरेंकडे जात असतील तर हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा धक्का असू शकतो.

एकूण 46 नगरसेवक गेले एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज (13 सप्टेंबर) ठाकरेंची आमदार आणि खासदारांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी या आमदार आणि खासदारांना मार्गदर्शन केले. याच बैठकीत शिंदे यांच्या पक्षात गेलेल्या एकूण 46 माजी नगरसेवकांचा विषय निघाला. 2017 सालच्या मुंबई पालिका निवडणुकीत हे सर्व नगरसेवक शिवसेनेच्या (संयुक्त) तिकिटावर निवडून आले होते. यातील 15 माजी नगरसेवक ठाकरेंकडे पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच माजी नगरसेवकांना पुन्हा पक्षात घ्यायचे की नाही, याबाबत पक्षाने भूमिका ठरवली पाहिजे, अशी भूमिका आमदार, खासदारांनी मांडली. त्यामुळे आता नेमका काय निर्णय घेतला जाणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.