पाकिस्तानमधून आलेली सीमा हैदर आणि तिचा भारतीय पती सचिन मीणा यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तब्बल ६५० कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घोटाळ्याच्या तपासात प्रवर्तन संचालनालयाने (ED) मोठा खुलासा केला आहे. या घोटाळ्यात हवाला व्यवहार आणि शेल कंपन्यांचा जाळे सामील असून सीमा आणि सचिन यांचे नाव व छायाचित्रांचा गैरवापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
दरभंग्याचे सीए बंधू मास्टरमाईंड
ईडीच्या माहितीनुसार, बिहारच्या दरभंगा येथील चार्टर्ड अकाउंटंट आशुतोष झा आणि विपिन झा हे या संपूर्ण प्रकरणामागील प्रमुख सूत्रधार आहेत. त्यांनी सीमा हैदर आणि सचिन यांच्या नावाने बनावट ओळखी तयार करून अरुणाचल प्रदेश सरकारकडून तब्बल ९९.२१ कोटी रुपयांची अफरातफर केली.या रॅकेटनं देशभरात शेल कंपन्या स्थापन केल्या. प्रत्यक्ष व्यवहार न करता बनावट बिले तयार करण्यात आली. त्याद्वारे ITC चा बनावट लाभ घेऊन केंद्र व राज्य सरकारला ६५० कोटी रुपयांचा तोटा पोहोचवण्यात आला. या पैशांचा मोठा हिस्सा हवाला आणि बेकायदा व्यवहारांत वापरण्यात आला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. झा बंधूंवर याआधीही अशाच प्रकारच्या फसवणुकीचे आरोप आहेत. २०२४ साली अरुणाचल प्रदेश पोलिसांनी त्यांना १०० कोटी रुपयांच्या ITC घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती.
ईडीची मोठी कारवाई
११ सप्टेंबर रोजी पहाटे सीमा हैदर ५ वाजल्यापासून ईडीने दिल्ली, हरियाणा, तमिळनाडू, तेलंगणा आणि अरुणाचल प्रदेश येथे एकाचवेळी धाडी टाकल्या. इटानगर येथील कार्यालयातून डिजिटल व कागदपत्रीय पुरावे जप्त करण्यात आले. आरोपितांची चौकशी लवकरच होणार असल्याचे संकेत आहेत.या प्रकरणातील सर्वात धोकादायक बाब म्हणजे सामान्य नागरिकांच्या नावांचा व ओळखींचा गैरवापर करण्यात आला. सीमा हैदर आणि सचिन मीणा यांसारख्या चर्चित नावांचा वापर करून घोटाळा आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.