Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
 

जीएसटी सुधारणांमुळे ऑटो क्षेत्राला सर्वाधिक फायदा होऊ शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळेच ऑटो कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, देशातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाला उत्पन्नाचा एक नवीन मंत्र दिला आहे. यासोबतच त्यांनी ऑटो उद्योगाला एक मोठा संदेशही दिला आहे. ते म्हणतात की जर देशातील सर्व ९७ लाख अयोग्य आणि प्रदूषित वाहने स्क्रॅप केली गेली, तर भारताला GSTमधून ४०,००० कोटी रुपयांचा फायदा होऊ शकतो.

वाहन स्क्रपिंगबद्दल गडकरी म्हणतात...
ACMAच्या वार्षिक बैठकीत बोलताना गडकरी म्हणाले की, या व्यापक स्वच्छता मोहिमेमुळे केवळ सरकारी महसूल वाढणार नाही तर ७० लाख रोजगार निर्माण होतील आणि पाच वर्षांत जगातील नंबर वन ऑटोमोबाईल उद्योग बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल. अहवालानुसार, सध्याची स्क्रॅपिंगची परिस्थिती खूपच सामान्य आहे. ऑगस्ट २०२५ पर्यंत, फक्त ३ लाख वाहने स्क्रॅप करण्यात आली आहेत, त्यापैकी १.४१ लाख वाहने सरकारी मालकीची होती. दरमहा सरासरी १६,८३० वाहने स्क्रॅप केली जात आहेत. भारतात वाहन स्क्रॅपिंची ही परिसंस्था तयार करण्यासाठी खाजगी क्षेत्राने २,७०० कोटी रुपये गुंतवले आहेत. भारताचे वाहन स्क्रॅपिंग धोरण याला व्हॉलंटरी व्हेईकल फ्लीट मॉडर्नायझेशन प्रोग्राम (V-VMP) म्हणूनही ओळखले जाते. ते धोरण पर्यावरणपूरक पद्धतीने जुनी, असुरक्षित आणि प्रदूषणकारी वाहने टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यासाठी डिझाइन केलेले आहे. त्यामुळे सर्व ९७ लाख अयोग्य आणि प्रदूषित वाहने स्क्रॅप केली गेली, तर भारताला ४०,००० कोटी रुपयांचा फायदा होऊ शकतो.
ऑटो सेक्टरला मोलाचा सल्ला

अहवालानुसार, गडकरी यांनी ऑटोमोबाईल उत्पादकांना नवीन वाहन खरेदी करताना स्क्रॅपेज प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ग्राहकांना किमान ५ टक्के सूट देऊन स्क्रॅपिंगला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की हे दान नाही, कारण त्यामुळे मागणी वाढेल. ते म्हणाले की स्क्रॅपिंग आणि रिप्लेसमेंटचे चक्र उद्योगाची मागणी मजबूत ठेवू शकते. गडकरी यांच्या मते, स्क्रॅपेज धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केल्यास ऑटोमोबाईल घटकांच्या किमती २५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात. कारण पुनर्वापर केलेले स्टील, अल्युमिनियम आणि इतर साहित्य पुरवठा साखळीत परत आणले जाईल. तसेच, ९७ लाख अयोग्य वाहनांना टप्प्याटप्प्याने काढून टाकल्याने उत्सर्जन कमी होईल, इंधनाचा वापर कमी होईल आणि रस्ते सुरक्षा सुधारेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.