Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विशाल काळे खून प्रकरण : दोघा भावांना पुणे येथे रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद:, सांगली एलसीबीची कारवाई

विशाल काळे खून प्रकरण : दोघा भावांना पुणे येथे रेल्वे स्टेशनवर केले जेरबंद:, सांगली एलसीबीची कारवाई
 
 
इस्लामपूर : येथील मार्केट यार्ड परिसरातील विशाल गर्‍या काळे (वय 35, रा. रेठरेधरण, ता. वाळवा) याच्या खून प्रकरणातील दोघा संशयिताना सांगली गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. दैवत बिरज्या पवार (वय 35), पवन बिरज्या पवार (वय 25, दोघे रा.साखराळे) अशी अटक केलेल्या संशयित भावांची नावे आहेत. पथकाने शुक्रवारी पहाटे पुणे रेल्वे स्थानकात दोघांना जेरबंद केले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. शनिवारी (दि.13) कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दुपारी विशाल व संशयित पवन, दैवत यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. पवन व दैवत यांनी चाकूने विशालवर हल्ला केला. त्याचा जागीच मृत्यू झाला होता. हल्ल्यानंतर संशयित पवन, दैवत यांनी पलायन केले.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, हवालदार उदय माळी, अरुण पाटील, संदीप गुरव, अतुल माने, रणजित जाधव, प्रकाश पाटील, संदीप पाटील, सागर लवटे, ऋतुराज होळकर, पवन सदामते, विनायक सुतार, सूरज थोरात, सुमित सूर्यवंशी, अभिजित माळकर, संकेत कानडे, गणेश शिंदे, अभिजित पाटील, अजय पाटील यांचे पथक त्यांच्या मागावर होते. शनिवारपासून संशयित पोलिसांना गुंगारा देऊन पळून जात होते. सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकामधील पोलिस उदय माळी, अरुण पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर पुणे रेल्वे स्टेशन येथे सापळा लावला. पथकाने तेथून दैवत व पवन यांना अटक केली. त्यांना इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.