Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साबण किंवा डिटर्जंटऐवजी, गाडी धुताना पाण्यात मिसळा 'या' २ वस्तु, सगळे डाग गायब अन् दिसेल नव्यासारखी चमक

साबण किंवा डिटर्जंटऐवजी, गाडी धुताना पाण्यात मिसळा 'या' २ वस्तु, सगळे डाग गायब अन् दिसेल नव्यासारखी चमक

दसरा हा सण उत्साहाने साजरा होतो आणि या दिवशी वाहनांची पूजा करून त्यांना स्वच्छ करणे ही आपली परंपरा आहे. पण धूळ, माती आणि खोलवर रुतलेले डाग गाडीवरून काढणे थोडे कठीण असते. वारंवार घासल्याने गाडीचा रंग खराब होण्याची भीती असते, तर रासायनिक डिटर्जंटमुळे पेंटला हानी पोहोचू शकते.

मग उपाय काय करावा याची चिंता आहे? काळजी करू नका

आम्ही तुमच्यासाठी एक सोपा, घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुमची गाडी नव्यासारखी चमकेल आणि डागही सहज निघतील. सामान्यतः लोक गाडी धुण्यासाठी शॅम्पू किंवा डिटर्जंट वापरतात. पण यामुळे गाडीला तात्पुरती चमक मिळते आणि पाणी सुकल्यानंतर डिटर्जंटचे पांढरे डाग दिसू लागतात. यासाठी पुन्हा ओल्या कापडाने पुसावे लागते, तरीही अपेक्षित चमक मिळत नाही. पण आता शॅम्पूसोबत दोन घरगुती वस्तु मिसळून तुम्ही गाडीला चमकवू शकता.

या वस्तु आहेत ENO आणि कोलगेट टूथपेस्ट..

कसे वापराल?

एका प्लास्टिकच्या मगमध्ये अर्ध्यापेक्षा कमी पाणी घ्या. त्यात एक पिशवी शॅम्पू मिसळा. जुन्या टूथब्रशच्या साहाय्याने त्यात थोडी टूथपेस्ट आणि अर्धा पॅकेट ENO घाला. हे मिश्रण नीट ढवळा. आता या द्रावणाला ब्रशच्या साहाय्याने गाडीवरील डागांवर लावा आणि हलक्या हाताने घासा.

ENO मधील सोडियम बायकार्बोनेट, सोडियम कार्बोनेट आणि सायट्रिक अॅसिड घाण आणि डागांची पकड सैल करतात, तर शॅम्पू गाडी स्वच्छ करतो. शेवटी पाण्याने गाडी धुवा. हा उपाय वापरून तुमची गाडी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नव्यासारखी चमकेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.