Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड! मातोश्रीवरुन उद्धव ठाकरेंचा आदेश, 'आजपासून मनसेच्या नेत्यांशी...'

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड! मातोश्रीवरुन उद्धव ठाकरेंचा आदेश, 'आजपासून मनसेच्या नेत्यांशी...'
 

शिवसेना-मनसे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अधिकृतपणे युती कधी जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन मोठा आदेश दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बदलापूर, कल्याण पश्चिम, भिवंडी अंबरनाथ येथील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. यादरम्यान त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना महत्त्वाचे निर्देश दिले ाहेत

स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव ठाकरेंच्या या आदेशानंतर त्यांनी मनसेसोबतच्या युतीला हिरवा कंदील दाखवल्याची चर्चा सुरु आहे. बैठकीच्या माध्यमातून दोन्ही पक्षाच्या आढावा बैठका घेऊन आपली तयारी पूर्ण ठेवा असं मार्गदर्शन उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्याना केलं आहे. तसंच पदाधिकाऱ्यांना एकत्रित आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मनसेच्या युतीला हिरवा कंदील दिल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना

सध्या मुंबईतील मनपा प्रभागाला शाखाप्रमुखाच्या व्यतिरिक्त इतर पदे निर्माण आली आहेच. उदा. शाखा समन्वयक, शाखासंघटक, शाखा निरीक्षक तसेच उपविभागप्रमुख उपविभाग समन्वयक इ. विशेषतः शाखाप्रमुख हे त्या त्या प्रभागातील आखेच्या कामकाजाला पुर्णपणे जबाबदार असतात. परंतु निर्मित केलेल्या इतरही पदाधिका-यांना ठोस जबाबदारी देणे आवश्यक आहे. अ) शाखा समन्वयक - शाखेतील (प्रभागातील) सर्व पुरुष/महिला युवासेना, अंगिकृत संघटना यांच्या सातत्याने समन्वय साधणे आणि शाखेचे काम अधिक शक्तीशाली बनविणे ही जबाबदारी शाखा समन्वयकाची आहे. ब) शाखासंघटक आखेतील (प्रभागातील) आपापसातील मतभेद मिटविणे आणि संघटनात्मक घड़ी विस्कळीत होऊ न देणे ही जबाबदारी आखासंघटकाची आहे. त्याचबरोबर सदस्य नोंदणी मतदार नोंदणी करणे, एकजुटीने शाखा कार्यान्वित करणे, या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित घेऊन शाखाप्रमुखाने खालीलप्रमाणे कर्तव्याचे पालन करावे.

ठाकरे बंधूंची शिंदे पिता-पुत्रांविरोधात रणनीती; थेट बालेकिल्ल्यात घुसण्याचा मास्टर प्लॅन

- स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही विधानसभा निवडणुक 2024 मधील मतदार यादीनुसारच होणार आहे. मतदार यादी प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.

- विधानसभा निवडणूक 2024 च्या मतदान केंद्रांची पाहणी करणे.

- प्रथम सर्व शाखाप्रमुख/पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणक 2024 ती शाखाप्रमुखांनी मतदार यादीचे वाचन नियुक्ती करणे, तसेच युवासेना, करण्याकरिता सक्षम पुरुष व महिला गटप्रमुखांची युवतीसेना पदाधिकाऱ्यांना देखील सोबत घेऊन त्यांना कार्यक्षम करणे आवश्यक आहे. मतदार यादीतील मतदार ओळखणे हे पोलिंग एजंटचे मुख्य कार्य आहे. तसेच मतदार यादीतील मतदारांची ओळख पटविणे यासाठी मुख्य पोलिंग एजंट व सहपोलिंग एजंट तातडीने नियुक्त करणे.

- यादीचे वाचन करीत असताना आपले मतदार ओळखून त्यांच्याशी सतत संपर्क ठेवणे आवश्यक आहे. यादीमध्ये आपल्या पक्षाचे मतदार किती व इतर पक्षाचे किती यांची माहिती असणे व नोंद ठेवणे गरजेचे आहे.

- मतदार यादीनुसार मतदारांच्या घरी जाऊन मतदारांचा शोध नोंद ठेवणे गरजे. यादीमध्ये एकूण किती मतदार आहेत. किती मयत झाले आहे. किती बाहेर गावी स्थलांतरीत झाले याची नोंद ठेवणे गरजेचे आहे.

- यादीमध्ये संशयित व दुबार मतदार आढळल्यास त्याची तक्रार स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे करणे व तक्रारीची एक प्रत शिवसेनाभवन येथे जमा करणे.

- प्रत्येक शाखेतील पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडिया ग्रुप कार्यरत ठेवणे.
शाखेतील ज्येष्ठ शिवसैनिकांशी संपर्क ठेऊन शाखेच्या दैनंदिन कार्यात त्यांना सन्मानाने सहभागी करून घेणे.

- 65 वर्षांवरील मतदारांशी आतापासूनच गटप्रमुखांमार्फत थेट संपर्क साधणे.

- शिवसैनिक नोंदणी, मतदार नोंदणी आपल्या विभागात सातत्याने करणे आवश्यक.

- शिवसेनेच्या कार्यकाळामध्ये मुंबई मनपाने केलेली कामे, निर्माण केलेल्या सोयी-सुविधा तसेच मा. श्री. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेली लोकोपयोगी कामे उदा. कोस्टल रोड, ५०० चौ. फूट पर्यंतच्या घरांना करमाफी, मुबलक पाणीपुरवठा, तसेच कोरोना काळामध्ये मुंबईकरांना कोरोना मुक्त करण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न आणि उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधा इ. कामे आपल्या विभागातील लोकांशी संवाद, संपर्क साधून लोकांपर्यंत पोहचविणे.

- इतर पक्षातून शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या विविध लोकांशी संपर्क करून त्यांना सन्मानाने शिवसेना प्रवाहात सहभागी करुन घेणे.

- प्रत्येक शाखाप्रमुखाने आपले सर्व उपशाखाप्रमुख व इतर पदाधिकारी तसेच गटप्रमुख यांची बैठक दर 15 दिवसांनी घेणे आवश्यक आहे.

- शाखेतील गटप्रमुखापर्यंतच्या सर्व नियुक्त्त्या करणे व नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांना कार्यरत ठेवणे ही जबाबदारी शाखाप्रमुखांची आहे.

विभागातील सामाजिक प्रश्न
- आपल्या प्रभागातील सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करणे. उदा. कचरा, पिण्याचे पाणी, तुंबलेली गटारे, रस्त्यावरील खड्डे, आरोग्य, धूर फवारणी या प्रश्नांच्या संदर्भात नागरिकांपर्यंत पोहचणे आणि ह्या महत्वाच्या प्रश्नासंदर्भात पक्षाच्या वतीने आंदोलन करणे. संबंधित प्रश्नांसंदर्भात शिष्टमंडळामार्फत अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्याचे निवारण करण्यासंदर्भात पाठपुरावा करणे व केलेल्या कामांची सोशल मीडियामार्फत प्रसिद्धी करणे.
 
- विरोधी पक्षाच्या कार्यक्रमावर नजर ठेवणे.
 
- विभागातील नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यास तत्पर असणे आवश्यक असून सदैव नागरिकांच्या संपर्कात रहावे.
 
- विभागात राबविण्यात येणाऱ्या विविध पुनर्विकास योजना, झोपडपट्टी पुनर्विकास योजना या संदर्भात सदर स्थलांतरीत व बाधित मतदारांशी सातत्याने संपर्कात राहणे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.