राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आ. गोपीचंद पडळकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तिव्र शब्दात जाहिर निषेध करुन टिका केली. आ. पडळकर यांनी जाहिर माफी मागावी. नाही तर घरातून बाहेर पडून देणार नाही. असा इशारा दिला. याप्रसंगी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, महिला अध्यक्षा सुनिता देशमाने, शहराध्यक्ष शहाजी पाटील, बँकेचे माजी अध्यक्ष शामराव पाटील, अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, बाजार समितीचे अध्यक्ष अशोक पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, अरुण कांबळे, युवक अध्यक्ष संग्राम जाधव, पुष्पलता खरात, विश्वजित पाटील यांच्यासह विविध संस्थाचे संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार जयंतराव पाटील व लोकनेते राजारामबापू पाटील व कुसुमताई पाटील आई साहेब यांच्यावर केल्या टिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खरपूस समाचार घेतला.
वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले की आ. पडळकर यांची लायकी नसताना टिका करीत आहे. मुख्यमंत्री यांनी असल्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा घालावा. राजकारणात असली निच परिस्थिती आहे. वाळवा तालुका पेठून उठल्यावर प्रशासनास आवरता येणार नाही. जत मधील अभियंताच्या आत्महत्या झाल्यावर चौकशी झाली पाहिजे याची मागणी केली आहे. परतु अजून गुन्हा दाखल झाला नाही. आ. जयंतराव पाटील यांच्यावर टिका करुन प्रशासनाचे लक्ष विचलीत करण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आ. पडळकर यांचा राजीनामा घ्यावा.
संजय पाटील म्हणाले की अवधूत वडर आत्महत्या मुद्याला बघल देण्यासाठी आ. पाटील यांच्या कुटुंबावर टिका केली जात आहे. याला हा कुत्रा जबाबदार आहे. आ. पाटील यांचे राजकारणात तुझ्या वया पैक्षा अधिक काम केले आहे. आता राजकारणात येवून लायकी नसताना आ. पाटील यांच्या वरील टिका खपवून घेणार नाही. मुख्यमंत्री यांनी प्रमुख नेत्यांना आव्हान देतो म्हणून आ. पाटील यांच्यावर टिका करण्यास हे कुत्रे मागे लावले आहे. वाळवा तालुक्यातील महिला यांची वाट लावल्या शिवाय राहणार नाही. गहखाते कुणाच्या हात आहे. आवर घालावा. अन्याता वाईट परिणाम होतील.झुंझारराव पाटील म्हणाले की आता आमचा संयम संपला आहे. अशा वक्तव्य करणारास आवर घालावा. अन्यता प्रशासनास अवघड जाईल. संभाजी कचरे म्हणाले की आता राजकारणात आला आहे. शिक्षकांचा मुलगा म्हणतो पण हा शिक्षकांचा नसावा. यांने बिरोबाची खोटी शपथ घेतली आहे. या कुत्र्यामुळे धनगर समाजाची हानी झाली आहे. आ. जयंतराव पाटील यांची माफी मागावी. सुनिता देशमाने म्हणाल्या आमदार पाटील यांचे राजकारणातील वर्षे व तुझ्या वया येवढे आहे. वाळवा तालुक्यातील महिला घरात येवून बांगड्या भरल्याशिवाय राहणार नाहीत.शहाजीबापू पाटील म्हणाले की स्वतःच्या गावात किंमत नाही. आटपाडी तालुक्यात किंमत नाही. समाजातून किंमत संपली आहे. त्यांची किंमत बिरोबाने संपविली आहे. आ. पडळकर यांनी माफी मागावी. नाही तर हे आंदोलन असेल चालू राहणार आहे. अरुणादेवी पाटील म्हणाल्या मुख्यमंत्री यांनी असल्या आमदारांना अवर घालावा.आमदारांनी काय विकास केला आहे हे सांगावे. याप्रसंगी विशाल माने, पुष्पलता खरात, सुनिल मलगुंडे, अशोक वाटेगावकर, पै. भगवान पाटील, आनंदराव मलगुंडे, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव चव्हाण, शिवाजी चोरमुले, शैलेश पाटील, सी. व्ही. पाटील, धैर्यशील पाटील, लालासाहेब अनुसे, माणिक शेळके, शिवाजी वाटेगावकर, अर्जुन माने, रोझा किणीकर, खंडेराव जाधव, छाया पाटील, डॉ. योजना शिंदे यांनी आ. पडळकर यांच्यावर टिका करुन जाहिर निषेध केले. घोषणा निम का पत्ता कडवा है। गोपीचंद भडवा है। या गोप्याचे करायचे काय डोके खाली पाय वर अशा विविध घोषणाने परिसर दणदणून सोडला होते.फोटो ओळीः- इस्लामपूर येथे आ. पडळकर यांचा निषेध करताना विजयराव पाटील व इतर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.