मुंबईतील शिवाजी पार्कवर असलेल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून शिवाजी पार्क परिसरात तणाव वाढला आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांनी त्यांनी पुतळ्याची साफसफाई केली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी घटनास्थळी दाखल झाले असूनही या ठिकाणी पाहणी केली. तसेच रंग फेकण्याऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यासंदर्भात बोलताना अनिल देसाई म्हणाले, हे कृत्य करणाऱ्यावर कोणतेही संस्कार झालेले नाही. ज्याने कुणीही रंग फेकला त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जातो आहे. अशा प्रवृत्तीविरोधात सरकार काय करत आहेत? सरकारचं काही कर्तव्य आहे की नाही? सरकारचं अपयश प्रत्येक ठिकाणी दिसते आहे, अशी टीका त्यांनी केली. पुढे बोलताना, शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी अशा प्रकारे घडत असतील, तर मुंबई सुरक्षित आहे का? असा प्रश्न पडतो. सरकारचं याकडे लक्ष नाही ते नको त्या गोष्टीत लक्ष देत आहेत, असेही ते म्हणाले. तसेच या घटनेची माहिती उद्धव ठाकरेंना दिल्याचंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक दाखल झाले असून त्यांनी पुतळ्याची साफसफाई केली आहे. त्यामुळे या भागात तणाव वाढला आहे. अशा समाज कंटकांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी शिवसैनिक करत आहेत. यासंदर्भात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही प्रतिक्रिया दिली. याप्रकरणी तसाप सुरु केला आहे. ज्यांनी कुणी रंग फेकला आहे. त्यांचा शोध घेतला जातो आहे. लवकरच त्याचा ताब्यात घेऊन त्यावर कायदेशीर करावाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. माँसाहेब या आमच्यासारख्या शिवसैनिकांसाठी महत्त्वाच्या आहेत. हा आमच्यासाठी भावनिक विषय आहे. याप्रकरणी सध्या निष्कर्ष काढणं योग्य नसून याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत, असेही ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.