पंतप्रधान मोदींचा पगार ऐकून थक्क व्हाल; पगाराशिवाय आणखी काय मिळतं त्यांना? जाणून घ्या सुविधा आणि एकूण संपत्ती
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७५ वा आहे. संपूर्ण देशभरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असून विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी मध्य प्रदेशातील धार येथे जाऊन अनेक प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. त्यांच्या कामगिरीबद्दल सर्वांना माहिती आहे. मात्र, त्यांच्या पगाराबाबत अनेकांना उत्सुकता असते. चला तर मग जाणून घेऊया त्यांचे उत्पन्न आणि उपलब्ध सुविधा..
पंतप्रधान मोदी किती पगार घेतात?
पंतप्रधानांचा पगार अपेक्षेपेक्षा कमी आहे. प्रत्येक पदासाठी ठरावीक पगार असतो आणि त्याचप्रमाणे मोदींना खालील वेतन दिले जाते -
मूळ वेतन : ५०,००० रुपये
उत्पादन भत्ता : ३,००० रुपये
दैनिक भत्ता : ६२,००० रुपये
मतदारसंघ भत्ता : ४५,००० रुपये
या सर्वांची बेरीज केल्यास पंतप्रधान मोदींना दरमहा १,६६,००० रुपये पगार मिळतो. त्यांचे वार्षिक उत्पन्न अंदाजे १९,९२,००० रुपये आहे.
वेतन रचना
१ दिवसाचा पगार : ५,५३३.३३ रुपये१ आठवड्याचा पगार : ३८,७३३.३३ रुपये१ महिन्याचा पगार : १,६६,००० रुपये१ वर्षाचा पगार : १९,९२,००० रुपयेपगाराव्यतिरिक्त मिळणाऱ्या सुविधापंतप्रधानांना केवळ पगार नाही, तर अनेक सुविधा केंद्र सरकारकडून दिल्या जातात. त्या या प्रमाणे -अधिकृत निवासस्थान : ७, लोक कल्याण मार्ग, नवी दिल्लीएसपीजी सुरक्षा : विशेष सुरक्षा गटाची २४ तास सुरक्षाप्रवास सुविधा : देशांतर्गत व परदेश प्रवासासाठी एअर इंडिया वन विमानातून मोफत प्रवासपेन्शन व आरोग्य सुविधा : पद सोडल्यानंतर आजीवन पेन्शन व मोफत वैद्यकीय सेवा
पंतप्रधान मोदींची एकूण संपत्ती
२०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण मालमत्ता ३.०२ कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्याकडे त्यावेळी फक्त ५२,९२० रुपये रोख रक्कम असल्याचेही नमूद केले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.