सांगली :- म्हणून मी मंगळसूत्र चोर म्हणून ओरडलो.मी गप्प नाही बसणार; जितेंद्र आव्हाडांचा पडळकरांना इशारा
सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना महाराष्ट्राची राजकीय संस्कृती विसरत आणि सगळ्या मर्यादा ओलांडत टीका केली होती. जयंत पाटलांनी आपल्याला एका प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला, जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औलाद आहे असं वाटत नाही. अशी वादग्रस्त टीका आमदार पडळकर यानी जयंत पाटील यांच्यावर केली होती.
राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच, विविध पक्षातील नेत्यांनी या टीकेचा निषेध व्यक्त केला होता. हे वक्तव्य महाराष्ट्रातील राजकीय परंपरेला शोभणारं वक्तव्य नाही अशी प्रतिक्रिया देखील येत होत्या. आज (22 सप्टेंबर) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वतीने आमदार पडळकर यांच्याविरोधात सांगली येथे महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात पक्षातील अनेक नेते सहभागी झाले आहेत.
या मोर्चा दरम्यान सांगलीत माध्यमांशी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळात झालेल्या राड्यावर खुलासा केला, ते म्हणाले, मी विधीमंडळात आल्यानंतर पडळकर यांनी, हा बघा आला लांड्याचा, असा शब्द उच्चार माझ्याबाबत केला होता. म्हणून मी मंगळसूत्र चोर म्हणून ओरडलो, त्या दिवशी जे बोलायचं ते बोललो आणि त्यानंतर त्यांनी माझ्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाला ती गाडी लागली असा किस्सा आव्हाड यांनी सांगितला. तसेच, जयंत पाटील गप्प बसले असतील पण मी गप्प बसणार नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हात जोडत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, असेच बोलत रहा आपल्या ओरिजनल संस्कृतीची महाराष्ट्राला ओळख करून द्या, आपण कसे आहोत हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे, आपण ओरिजनल कसे आहोत हे सर्वांना समजू द्या. असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांची अप्रत्यक्षरित्या पडळकर आणि भाजप नेत्यांना लगावला आहे.
दरम्यान,
भारत आणि पाकिस्तान यांच्यातीलसामन्यादरम्यान पाकिस्तानच्या फलंदाजाने
बंदुकीच्या गोळीच्या स्टाईलनेसेलिब्रेशन केले होते. त्या
क्रिकेटपटूच्याकृतीकरून आमदार जितेंद्रआव्हाड यांनी मोदी सरकारवर टीका केली
आहे. ते म्हणले खेळवा मॅच अजून, दहशतवाद्याकडून मारले
गेलेल्यांच्याकुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे,
असेहीआव्हाड म्हणले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.