Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हा बँकेतील नोकरभरती घोटाळ्याची चौकशी होणारच, मंत्री चंद्रकांत पाटील लागले कामाला

सांगली जिल्हा बँकेतील नोकरभरती घोटाळ्याची चौकशी होणारच, मंत्री चंद्रकांत पाटील लागले कामाला

दिलीप पाटील यांच्यावर टीका, जिल्हा बँकेतील alleged घोटाळ्याची चौकशी होणारच, आमदार जयंत पाटील यांच्यावर लॉटरी घोटाळ्याचा आरोप.

महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चात जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबाबत हातवारे करून केलेल्या विधानांचा आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. आता जिल्हा बँकेतील नोकर भरती घोटाळ्याची चौकशी होणारच, त्यासाठी भले मला उपोषणाला बसावे लागले तरी चालेल, असे सांगून त्यांनी आता दिलीप पाटलांची घेराबंदी केली जाईल, असा इशारा दिला.

भाजप संपर्क कार्यालयाच्या उद्‍घाटन कार्यक्रमात त्यांनी दिलीप पाटलांचे नाव न घेता हल्ला चढवला. सोबतच, आमदार जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही आव्हान दिले. चंद्रकांत पाटील म्हणाले, 'जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकर भरती घोटाळा झाला आहे आणि त्याची जाहीर चौकशी आता झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, त्यासाठी लागलेच तर उपोषणाला बसायची माझी तयारी आहे. आता सोडणार नाही. या बँकेत कमी तारण घेऊन जादा कर्ज दिले गेले, त्याचीही चौकशी होईल.'

आमदार जयंत पाटील हे अर्थमंत्री असताना लॉटरी घोटाळा झाला होता, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. या घोटाळ्याची आता चौकशी करावा लागेल. ठाण्यात एका बिल्डरने आत्महत्या केली, त्याच्या डायरीत एका नेत्याचे नाव होते, त्यातून बचावासाठी तो कसा देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर चकरा मारत होता, हेही आता सांगायची वेळ आली आहे, असा हल्लाबोल त्यांनी कुणाचेही नाव न घेता केला. वाशी मार्केटमधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशीही मी मागणी करतोय, असेही श्री. पाटील म्हणाले.

'सर्वोदय'चा परत घ्यायचाच

कारंदवाडी येथील सर्वोदय साखर कारखाना जयंत पाटील यांनी हडप केला, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. ते म्हणाले, 'सर्वोदय कारखान्यासाठी पृथ्वीराज पवार, गौतम पवार ही पोरं लढत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि मी त्यांच्या पाठीशी आहोत. कारखाना परत घेऊच.'

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.