Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'...तोपर्यंत तुला कोणत्याही पदावर जाऊ देणार नाही,' एकेरी उल्लेख करत करुणा मुंडेचा इशारा, 'तुझी बायको रस्त्यावर...'

'...तोपर्यंत तुला कोणत्याही पदावर जाऊ देणार नाही,' एकेरी उल्लेख करत करुणा मुंडेचा इशारा, 'तुझी बायको रस्त्यावर...'
 

आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या .अशी मागणीही धनंजय मुंडेंनी केली आहे. यानंतर करुणा मुंडेंनी त्यांनी टोला लगावला असून, ज्यांना काम करायचं आहे त्यांना पदाची गरज नसते असं म्हटलं आहे. तसंच आपली एखादी संपत्ती विकून शेतकऱ्यांना मदत करु शकता असा टोलाही लगावला आहे. इतकंच नाही तर त्यांची आमदारकीसुद्धा रद्द करुन दाखवणार आहे असा इशाराही दिला आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांचे नाव आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर, काही काळ ते वैद्यकीय कारणास्तव सार्वजनिक कार्य्रकमापासून दूर होते.

"मला रिकामं ठेवू नका असं धनंजय मुंडेनी म्हटलं आहे, पण ज्यांना काम करायचं आहे त्यांना पदाची गरज नसते. धनंजय मुंडे अद्याप आमदार असून काम करु शकतात. तुम्ही एखादी प्रॉपर्टी विका आणि बीड, परळीतील जनता ज्यांनी तुम्हाला मागील 40-45 वर्षांपासून सहकार्य केलं आणि मुंडेंची सत्ता कायम ठेवली त्यांची मदत करा. आता तुमची वेळ आहे. तुम्ही रिकामे बसू नका, एखादी प्रॉपर्टी विकली तरी बीडमधील शेतकऱ्यांना 50 हजार कोटींची सरसकट मदत होईल," असं करुणा मुंडेंनी म्हटलं आहे. 
 
"माझा मुलगा घरात बंद आहे. त्यांच्या डोक्यावर काही परिणाम झाला तर धनंजय मुंडे तू स्वत:ला माफ करु शकणार नाही," असंही एकेरी उल्लेख करत त्यांनी म्हटंल. "जोपर्यंत तुझी बायको रस्त्यावर रिकामी फिरत आहे, आज मुलगा घरात रिकामा बसला आहे. जोपर्यंत माझ्या मुलाला आणि मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत तुला एकाही पदावर जाऊ देणार नाही. आमदारकी सुद्धा रद्द करुन दाखवणार आहे," असा इशाराही त्यांनी दिला. मंत्री, आमदारांनी अनेक गाणाऱ्या, नाचणाऱ्या महिलांना 20 कोटीची संपत्ती दिली आहे. ज्या शेतकरी, लोकांच्या मतदानावर मोठे होत आहात त्यांना 2 हजार रुपये प्रती एकर देत आहात," अशी टीकाही त्यांनी केली.

धनंजय मुंडेंनी काय म्हटलं आहे?

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे की, सुनील तटकरेंनी आम्हाला कायम मार्गदर्शन करत राहावं. चुकले तर कान धरावा. नाही चुकलं तर चालतं का? पण आता रिकामं ठेवू नका. काहीतरी जबाबदारी द्या. दरम्यान अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल, त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल असं सांगितलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.