Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जयंत पाटलांसाठी विश्वजीत कदम मैदानात, गोपीचंद पडळकरांना सुनावले, 'टोकाचे वैमनस्य असले तरी...'

जयंत पाटलांसाठी विश्वजीत कदम मैदानात, गोपीचंद पडळकरांना सुनावले, 'टोकाचे वैमनस्य असले तरी...'
 
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली. स्वतः शरद पवार यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत नाराजी व्यक्त केली. त्यातच आता काँग्रेस पक्षाचे आमदार विश्वजीत कदम हे जयंत पाटलांच्या बाजुने मैदानात उतरले आहे. त्यांनी थेट जतचे आमदार म्हणत कडक शब्दांत गोपीचंद पडळकरांना सुनावले आहे. 
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे की, 'स्व. राजारामबापू देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असणारे स्वातंत्र्यसैनिक तसेच महाराष्ट्राच्या विकासामध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं योगदान पाहता त्यांच्यावर जतच्या विद्यमान आमदारांनी केलेलं वक्तव्य हे वेदना देणारं आहे. किती ही राजकीय टोकाचे वैमनस्य असले तरी जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी आजपर्यंत व्यक्तीगत किंवा कौटुंबिक आरोप प्रत्यारोप केले नाहीत, ही मर्यादा जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी पाळली पाहिजे.'

जयंत पाटलांसाठी विश्वजीत कदम मैदानात, गोपीचंद पडळकरांना सुनावले, 'टोकाचे वैमनस्य असले तरी...'
 
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली. स्वतः शरद पवार यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत नाराजी व्यक्त केली. त्यातच आता काँग्रेस पक्षाचे आमदार विश्वजीत कदम हे जयंत पाटलांच्या बाजुने मैदानात उतरले आहे. त्यांनी थेट जतचे आमदार म्हणत कडक शब्दांत गोपीचंद पडळकरांना सुनावले आहे.

सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये विश्वजीत कदम यांनी म्हटले आहे की, 'स्व. राजारामबापू देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असणारे स्वातंत्र्यसैनिक तसेच महाराष्ट्राच्या विकासामध्ये सुद्धा त्यांनी दिलेलं योगदान पाहता त्यांच्यावर जतच्या विद्यमान आमदारांनी केलेलं वक्तव्य हे वेदना देणारं आहे. किती ही राजकीय टोकाचे वैमनस्य असले तरी जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी आजपर्यंत व्यक्तीगत किंवा कौटुंबिक आरोप प्रत्यारोप केले नाहीत, ही मर्यादा जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी पाळली पाहिजे.' 'सांगली जिल्हा महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखला जाणारा जिल्हा आहे. काल जतच्या विद्यमान आमदारांनी बोलताना स्व.राजारामबापू आणि जयंतराव पाटीलसाहेबांवरती केलेलं वक्तव्य निंदनीय आहे.', असे देखील कदम यांनी म्हटले आहे.

सांगली जिल्ह्याच्या वारसा सांगितला...
कदम यांनी आपल्या फेसबूकवरील पोस्टमध्ये सांगली जिल्ह्यातील राजकीय वारसा सांगत पडळकरांचे कान टोचले आहेत. ते म्हणाले, सांगली जिल्हा महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखला जाणारा जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्याने स्व. यशवंतराव चव्हाणसाहेब, स्व. वसंतदादा पाटील, स्व. राजारामबापू पाटील, स्व.शिवाजीराव देशमुखसाहेब, स्व.पतंगराव कदमसाहेब , स्व. आर. आर. आबा पाटील, मा. आण्णासाहेब डांगे, स्व.शिवाजीराव शेंडगे बापू, यांसारखे महाराष्ट्राला प्रगतीची नवी दिशा देणारी नेतृत्वं दिली आहेत. अगदी मा. आण्णासाहेब डांगे आणि शिवाजीराव शेंडगे बापू यांनीही या जिल्ह्यात आजपर्यंत सुसंस्कृत आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं राजकारण केलेलं आहे.शिवाजीराव शेंडगे बापूंचे चिरंजीव श्री. प्रकाशआण्णा शेंडगे यांनीही काही काळ जत तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी सुद्धा उत्तमप्रकारे काम केलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.