Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तानाजी सावंतांचे मंत्रिपद पक्के! शिंदेंच्या 'या' दोन मंत्र्यांना द्यावा लागणार राजीनामा?

तानाजी सावंतांचे मंत्रिपद पक्के! शिंदेंच्या 'या' दोन मंत्र्यांना द्यावा लागणार राजीनामा?
 

पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असून धनंजय मुंडे आणि तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळणार आहे, असे वृत्त एका वर्तमानपत्राने दिले आहे. मंत्रिमंडाळातील सर्व मंत्रि‍पदाचा जागा भरलेल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेत धनंजय मुंडेंना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तानाजी सावंतासाठी कुठल्या मंत्र्याला नारळ मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी तानाजी सावंतांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले होते. त्यांनी बंददाराआड सावंतांशी चर्चा देखील केली. मराठवाड्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिंदे आले असता त्यांच्यासोबत तानाजी सावंत हे देखील होते. त्यामुळे सावंत यांची लवकरच मंत्रिमंडळात एन्टी होईल, असे बोलले जात आहे.

तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात संधी देण्याच्या चर्चा असताना शिवसेनेचे दोन मंत्री डेंजर झोनमध्ये आहेत. त्यापैकी एकाचा राजीनामा घेण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र, शिवसेनेकडे अधिकृतरित्य यावर अजून कोणीही भाष्य केलेले नाही. त्या दोन मंत्र्यांमध्ये संजय सिरसाट आणि भरत गोगावले यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. 
 
संजय सिरसाट यांच्यावर विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. सिडकोतील जमीन वाटपाच्या एका प्रकरणावरून रोहित पवार त्यांना टार्गेट करत आहेत. त्यातच पैशाचे भरलेली बॅग त्यांच्या बेडरुमध्ये दिसत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यामुळे संजय शिरसाट यांचे मंत्रिपद अडचणीत असल्याची चर्चा आहे.

भरत गोगावले डेंजर झोनमध्ये

भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहेत. मात्र, गोगावले यांच्या खात्याची कामगिरी समाधानकारक नसल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील मंत्र्यांना त्यांची कामागिरी सुधारण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे भरत गोगावले हे देखील डेंजर झोनमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.