एसटी बँकचा (स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक) ७२वा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचा फोटो लावण्यात आला आहे. त्यावरून नवा वाद उभा राहिला आहे.
यापूर्वीही वार्षिक अहवालात नथुराम गोडसे याचा फोटो वापरण्यात आला होता.
गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्तेंवर तत्काळ कारवाई करावी,
अशी मागणी करण्यात येत आहे. प्रभू राम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या
बाजूला खुनी नथुराम गोडसेच्या फोटो छापणे अत्यंत शरमेची बाब असल्याचा टीका
सर्वत्र करण्यात येत आहे. एसटी बँकेवर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचे पॅनल
निवडून आल्यापासून सातत्याने वाद निर्माण होत आहेत. सहकार खात्याने आणि
रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ आणि कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत. त्यातून
आता एक नवा वाद सुरू झाला.
या अहवालात छापलेल्या फोटोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्यासह ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांचा पत्नी आदींचे फोटो आहेत. एसटी बँकेने तयार केलेल्या एटीएम कार्डवर कमळाचे चिन्ह छापण्यात आले आहे. या संपूर्ण अहवाल पुस्तिकेत एकूण १५ फोटोंमध्ये गुणरत्न सदावर्ते आहेत. काही फोटोमध्ये पत्नी, मुलीचा समावेश आहे. सदावर्तेसारख्या विकृत माणसाकडून दुसरी अजून अपेक्षा तरी काय? आमच्या राजाच्या आणि प्रभू रामचंद्रांच्या सोबत एका खुन्याचा फोटो लावणे कितपत योग्य आहे? शहाजी पाटील समितीने बँकेचा कोट्यवधीचा घोटाळा उघड करूनही या व्यक्तीवर कारवाई होत नाही.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, एसटी कामगार सेना
छत्रपती
शिवाजी महाराजांच्या बाजूला खुनी नथुराम गोडसेचा फोटो छापणे लांच्छनास्पद
आहे. शिवाजी महाराज हे सर्वश्रेष्ठ राजे होते. त्यांच्या बाजूला नथुरामला
बसवणे हा किळसवाणा प्रकार आहे. बँकेत केलेले घोटाळे लपवण्यासाठी राज्य
सरकारमधील प्रभावी नेत्यांसोबत फोटो छापण्यात आले आहेत.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, एसटी कर्मचारी काँग्रेस
अत्यंत घृणास्पद हा प्रकार आहे. हे विकृत मानसिकतेचे लक्षण आहे.
- अमर काळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
वादाचा अहवाल
१. प्रभू राम व छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला नथुरामचा फोटो२. 'देश में रहना होगा, वंदे मातरम् कहेना होगा' असे नारे३. बिग बॉसमधील सलमान खानसोबत फोटो४. १५ फोटोंमध्ये सदावर्ते, त्यांची पत्नी आणि मुलीचा समावेश
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.