महाराष्ट्राच्या राजकारणात सांगली जिल्ह्याला पूर्वीपासूनच महत्त्व आहे. कधीकाळी सांगली जिल्ह्यातून महाराष्ट्राचे राजकारणाची चक्रे फिरली आहेत. सांगली जिल्ह्याला मुख्यमंत्रीपदाच्यारूपाने वसंतदादा पाटील लाभले असले तरी त्यांचे सरकार पाडण्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा प्रमुख हात होता, आज देखील हे जाहीरपणे सांगितले जाते. पण सरकार पाडले म्हणून कधीही व्यक्तिगत टीका शरद पवार यांच्यावर झाली नाही.
हा एक महाराष्ट्राच्या राजकीय
संस्कृतीचा भाग होता. राजकारण आणि पातळी न सोडता केलेली व्यक्तिगत टीका ही
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा एक भाग होता. राजकारणातील तत्वे, मूल्ये
अनेक मातब्बर नेत्यांनी आणि जुन्या जाणत्या पुढाऱ्यांनी आजवर पाळली. पण
सध्याच्या राजकारणातील राज्यकर्त्यांनी ही संस्कृती पायदळी तुडवली आहे.
याचा प्रत्यय भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या जयंत पाटील
यांच्याबद्दल वक्तव्याने आला आहे.
भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर हे सध्या सत्तेत असले तरी ते नेहमीच आपल्या विखारी बोलण्याने चर्चेत असतात. पण त्यांचा हा विखारीपणा इतका खोलवर गेला आहे की विरोधकांच्या बापांची औलाद काढण्यापर्यंत. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे का? हे विचारण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे. त्याचाच रोष आज सांगली जिल्ह्यात दिसून येत आहे. जयंत पाटील यांच्यावर केलेल्या विखारी वक्तव्यानंतर सांगली जिल्ह्यातील जयंत पाटील यांचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. तिकडे आमदार पडळकर यांच्या वक्तव्याने सांगलीत राजकीय रान पेटले असताना दुसरीकडे मात्र सांगली जिल्ह्याला शांत ठेवण्याचा संदेश जयंत पाटील यांनी न बोलण्यामागे दिला आहे.जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाले असल्या तरी पाटील यांनी या वक्तव्यावर बोलण्या स्पष्टपणे नकार दिला आहे. दुसरीकडे त्यांच्याच माध्यमातून एक व्हिडिओ आमदार पडळकर त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ व्हायरल करण्यात आला आहे. "माता पिता के संस्कार है इसलिये हमारा बुरा होते हुए भी हमारा स्वभाव शांत है! अन्यथा जिस दिन मर्यादा छोड देंगे! सब का घमंड तोड देंगे! अशा शब्दांत उत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
जतमध्ये
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे माजी
प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी कोणतेही भाष्य करणे टाळले आहे.
आज जयंत पाटील हे सांगलीमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता माध्यम
प्रतिनिधींनी त्यांना पडळकर यांच्या टिकेबाबत प्रश्न विचारला. यावर "मी
काहीही बोलणार नाही जे काय चाललंय ते तुम्हीच बघा" अशी प्रतिक्रिया माध्यम
प्रतिनिधींना दिली आणि ते निघून गेले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.