सांगली : मराठा आरक्षण लढ्यात राज्य शासनातर्फे अत्यंत महत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सत्कार भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी केला. मुंबईत मंत्रालयात त्यांनी श्री. पाटील यांचे आभार मानले. भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख,
जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, गुलाबराव पाटील ट्रस्टचे विश्वस्त विरेंद्र
पाटील प्रमुख उपस्थित होते. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा
आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईत बेमुदत उपोषण केले.
प्रश्न चिघळेल, असे वाटत असताना राज्य शासनाने सर्वमान्य तोडगा काढला. त्याबाबतचा मसुदा घेऊन राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे यांची भेट घेतली. या आंदोलनात ही भेट महत्वाची ठरली, असे कौतुक मान्यवरांनी केले. पृथ्वीराज पाटील यांनी विखे-पाटील यांच्यासोबत चर्चेत सहकारमहर्षी गुलाबराव पाटील आणि ज्येष्ठ नेते स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील स्नेहबंधाच्या आठवणींना उजाळा दिला. जलसंपदा मंत्री म्हणून विखे पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीशी निगडीत काही प्रश्नांवर साथ द्यावी. चांदोली धरणातून सांगलीसाठी थेट पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव चर्चेत असून त्याकामी सहकार्य करावे, असे आवाहनदेखील पृथ्वीराज पाटील यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.