Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली:- कृष्णा नदीत आढळला बांधकाम विभागाच्या अभियंत्याचा मृतदेह; नातेवाइकांना संशय, आमदाराच्या पीएसह अनेकांची नावं घेतली

सांगली:- कृष्णा नदीत आढळला बांधकाम विभागाच्या अभियंत्याचा मृतदेह; नातेवाइकांना संशय, आमदाराच्या पीएसह अनेकांची नावं घेतली
 

वडार यांना आमदार सहाय्यक आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांकडून सहा महिन्यांपासून त्रास दिला जात होता. पोलिस तपास सुरू असून, नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही. सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्याचा मृतदेह आढळला आणि जिल्ह्यात खळबळ उडाली. अवधूत अशोक वडार असं या सरकारी अधिकाऱ्याचं नाव होतं. जत पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागात ते कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. ही आत्महत्या नव्हे, तर घातपात आहे, असा संशय नातेवाइकांना आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाइकांनी घेतला आहे. 


कनिष्ठ अभियंता अवधूत वडार हे जतच्या बांधकाम उपविभागात कार्यरत होते. सांगलीच्या कृष्णा नदीत आज, शनिवारी त्यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी, नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. वडार यांना आमदाराचा स्वीय सहायक आणि जिल्हा परिषदच्या माजी सदस्याचा पती आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांकडून वारंवार त्रास दिला जात होता, असा खळबळजनक आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.