पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे सांगलीत स्वच्छता
अभियान आमदार गाडगीळ यांचा पुढाकार; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली, दि.१७: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे आणि नागरिकांच्या सहभागाने सांगली विधानसभा क्षेत्रात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम करण्यात आला. हुतात्मा स्मारक, सरकारी घाट तसेच सांगली-कुपवाड परिसरात स्वच्छता अभियान झाले. पंतप्रधान मोदी यांच्या “स्वच्छ भारत, सुंदर भारत” या संकल्पनेला गती देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सांगली, कुपवाड परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व विविध पदाधिकारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
या स्वच्छता मोहिमेत परिसरातील कचरा, प्लास्टिक व घाण साफ करण्यात आली. “आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही केवळ शासनाची नव्हे; तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे” असा संदेशही यावेळी देण्यात आला. उपस्थितांनी परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती केली. “स्वच्छतेतूनच आरोग्य आणि विकासाचा मार्ग प्रशस्त होतो” असे सांगितले. या उपक्रमात आमदार गाडगीळ, पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख केदार खाडीलकर, माजी नगरसेवक सुबराव मद्रासी, युवराज बावडेकर, लक्ष्मण भाऊ नवलाई, नगरसेवक उत्तम साखळकर, नगरसेवक राजेंद्र कुंभार, माजी नगरसेविका भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर, जिल्हा उपाध्यक्ष विशाल पवार, शैलेश पवार, हेमलता मोरे, मंडलाध्यक्ष रवींद्र वादवणे, राहुल नवलाई, राहुल नवलाई, अमित देसाई, कृष्णा राठोड, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप कुकडे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रथमेश वैद्य, शुभम देसाई मध्यमंडल उपाध्यक्ष चंदन संनदी, श्रेयस शिंदे, शहाजी भोसले अमर पडळकर प्रकाश नवलाई भीमसेन नवलाई अक्षय नवलाई प्रथमेश नवलाई मा.नगरसेवक उत्तम साखळकर मा.नगरसेवक राजेंद्र कुंभार राहुल ढोपे पाटील राजेंद्र रजपूत जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पवार भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील अरुणा बाबर मनीषा सातपुते पद्मजा मुळीक स्वप्निला नवलाई वैशाली शेळके संजय मगदूम मयूर नवलाई मंडल सरचिटणीस बबन मंडलिक मंडल सदस्य अजय मोर्ची लक्ष्मण ऐनापुरे राज पाटील सागर धनवे, यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. आमदार गाडगीळ म्हणाले,या स्वच्छता उपक्रमाने परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मकता व प्रेरणा निर्माण केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रेरणेतून केलेला हा छोटासा उपक्रम भविष्यात स्वच्छ, निरोगी आणि विकासाभिमुख भारत घडविण्यास निश्चितच हातभार लावेल.
.......
*फोटो कॅप्शन*
सांगली:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या
वतीने आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली शहरात ठिकठिकाणी
स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.