सांगली: समोरच्या व्यक्तीकडून इत्थंभूत माहिती काढून त्यांना गंडा घातल्याचे प्रकार अनेक पाहिलेत. आता पोलिसदादांनाही या हॅकर्स मंडळींनी सोडले नाही. संजयनगर परिसरातील एका दादांचे सिमकार्ड हॅक करून बँक खात्यातील दोन लाख २९ हजारांची रक्कम परस्पर काढून घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
झाकीरहुसेन अल्लाबक्ष कालेकर (महात्मा गांधी कॉलनी, जुना कुपवाड रस्ता, सांगली) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही फसवणूक २० ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन ते २२ ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या कालावधीत घडली. पोलिसांनी सांगितले, की संशयिताने एका क्रमांकावरून फिर्यादी कालेकर यांच्याशी संपर्क साधला.त्यानंतर कालेकर यांच्या ॲक्सेस, एचडीएफसी, स्टेट बॅँक ऑफ इंडिया आणि बॅँक ऑफ बडोदा या बँकेचा डाटा मिळविला. संशयिताने कालेकर यांचे सिमकार्ड हॅक करून त्यांच्या खात्यातील २ लाख २९ हजार रुपये परस्पर काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कालेकर यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या अनोळखी हॅकर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.