Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देशिंग येथे १४० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

देशिंग येथे १४० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान 
 

कवठेमहांकाळ:  संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन च्या वतीने सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी संत निरंकारी सत्संग भवन देशिंग या ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून १४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचा शुभारंभ नंदकुमार झांबरे,  झोनल प्रमुख सातारा ( झोन ३४A ) यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलनाद्वारे करण्यात आला. याप्रसंगी जालिंदर जाधव ( सेक्टर संयोजक सांगली ) किशोर माने (क्षेत्रीय संचालक सातारा  क्षेत्र) जगन्नाथ निकाळजे क्षेत्रीय संचालक सांगली क्षेत्र  डॉ. यशवंत शेंडे ब्लड संकलन अधिकारी मिरज आदी उपस्थित होते.
  
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून मानवतेच्या कल्याणार्थ वेळोवेळी वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर, नैसर्गिक संकटाच्या वेळेस सहाय्यता करणे असे अनेक सामाजिक उपक्रम नियमित राबविण्यात येतात. रक्तदानाच्या माध्यमातून आपण दुसऱ्या व्यक्तीशी रक्ताचे नाते जोडू शकतो असा सुंदर संदेश देण्यात येतो. सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांचा  सत्य प्रेम व एकत्वाचा संदेश जगामध्ये मानवता आणि विश्वबंधुत्व स्थापन करणारा आहे. 
 

देशिंग  येथे संपन्न झालेल्या शिबिरात मिरज 
येथील मिरज सिव्हिल ब्लड बँक 
सांगली सिव्हिल ब्लड बँक, व शिरगावकर ब्लड बँक सांगली 
यांनी रक्त संकलित करण्याचे कार्य केले.
   या रक्तदान  शिबिर यशस्वी करण्यासाठी स्थानिक सेवादल युनिट द्वारे उत्तम असे नियोजन केले होते. शिबिरासाठी सरपंच 
प्रवीण पवार,पै.आण्णा
कोळेकर, सेवा निवृत्त अॉडनेरी कॅप्टन महालिंग स्वामी,
इत्यादी उपस्थित होते. या शिबिराला 
स्थानिक आमदार रोहित दादा आर आर पाटील यांनी भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला.
अनेक मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन, रक्तदान करून शुभेच्छा दिल्या. आलेल्या सर्व अतिथींचे  ब्रॅच मुखी अलका सुतार यांनी आभार मानले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.