सांगली : प्रतापसिंह उद्यानासमोरील फूटपाथवर भेळचे गाडे लावण्यास महापालिकेने विरोध केला. मात्र त्याला न जुमानता भेळचे गाडे लावण्यात आले. त्यामुळे महापालिकेने भेळच्या गाड्यांसमोर अतिक्रमणविरोधी पथकाचे ट्रक लावत कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
त्यातून वादावादीचा प्रकार घडला.
महापालिका मुख्यालय इमारतीला लागून प्रतापसिंह उद्यानासमोरील फूटपाथवर सुमारे आठ ते नऊ भेळचे गाडे लागतात. सायंकाळपासून याठिकाणी मोठी गर्दी होते. भेळ गाड्यांसमोरील वाहने रस्त्यावर पार्क होतात. त्यामुळे वाहतुकीला अडचण येते. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर आयुक्त सत्यम गांधी यांनी फूटपाथवरील भेळचे गाडे हटवण्याचे आदेश दिले. दरम्यान, सहायक आयुक्त सहदेव कावडे, अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख सहायक आयुक्त सचिन सागावकर व अधिकारी यांनी सोमवारी फूटपाथवरील भेळचे गाडे हटवण्यास सुरुवात केली. मात्र भेळविक्रेत्यांनी विरोध केला. तेवढ्यात संघटनांचे पदाधिकारी आले. प्रथम पुनर्वसन करा, मग गाडे हटवा, असा पवित्रा विक्रेते, संघटना नेत्यांनी घेतला. त्यावर महापालिका प्रशासनाने भेळच्या गाड्यांसमोर अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या गाड्या लावून नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केला. त्यातून वादावादीचा प्रकार घडला. दरम्यान, मंगळवारी हे गाडे हटवले जाणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.