Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बसला ना मजबूत फटका! कोटींची Ferrari कार E20 पेट्रोलमुळे झाली खराब, चक्क सोशल मीडियावर नितीन गडकरी यांना सुनावलं

बसला ना मजबूत फटका! कोटींची Ferrari कार E20 पेट्रोलमुळे झाली खराब, चक्क सोशल मीडियावर नितीन गडकरी यांना सुनावलं
 

गेल्या काही दिवसांपासून E20 पेट्रोलबाबत सोशल मीडियावर जास्त ट्रेंड होत होते. एवढेच काय देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा नागरिकांना E20 पेट्रोल वापरण्याचे आव्हान केले. तसेच अनेक ऑटो कंपन्यांनी सुद्धा E20 पेट्रोलला पाठिंबा दर्शवला होता. मात्र, यासोबतच काहींनी या पेट्रोलच्या प्रकाराबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. अशातच आता एक Social Media पोस्ट व्हायरल होत आहे.

गेल्या काही आठवड्यात, अनेक वाहन मालकांनी इंधनात मिसळलेल्या 20 टक्के इथेनॉलच्या वापराशी संबंधित विविध समस्या नोंदवल्या होत्या. या E20 पेट्रोलमुळे वाहनांच्या मायलेजमध्ये विविध समस्या येत आहे अशी तारकार देखील करण्यात आली होती. अलीकडेच, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये, कोट्यवधी रुपयांची फेरारी सुरू न झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे दिसून येते. या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की या कारमध्ये E20 फ्युएल भरले होते. ज्यामुळे आता ती सुरू होत नाही आहे. 
 
सोशल मीडिया X वरील Rattan Dhillon यांनी त्यांच्या पेजवर E20 फ्युएल भरल्यानंतर रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या फेरारीचा फोटो शेअर केला. फोटोमध्ये एक फेरारी दिसते, जी Roma किंवा Portofino असू शकते, लाल फेरारी ब्रँडेड कव्हरने झाकलेली आणि रस्त्याच्या कडेला पार्क केलेली आहे. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की ही फेरारी युझरच्या मित्राची आहे. त्याने सांगितले की काही दिवसांपूर्वी कारमध्ये E20 पेट्रोल भरण्यात आले होते आणि आता ती सुरू होत नाही. त्या व्यक्तीने सांगितले की फेरारी एका सर्व्हिस सेंटरमध्ये नेण्यात आली, जिथे टेक्निशियन सांगितले की समस्येचे कारण E20 फ्युएल आहे.


नेमकं Ferrari सोबत घडले काय?
Ferrari च्या टेक्निशियनच्या मते, इथेनॉल-मिश्रित फ्युएलमुळे कारचे नुकसान झाले आहे, मात्र नेमके नुकसान किती झाले याबाबत त्यांनी उघड केलेले नाही. या समस्येमुळे धिल्लोन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, कारवर कोट्यवधी रुपये खर्च करून, रोड टॅक्स, वाहन जीएसटी टॅक्स आणि फ्यूल टॅक्स भरल्यानंतर, भारतात कारच्या किंमतीपेक्षा तिप्पट खर्च करूनही त्यांना शेवटी हेच अनुभवायला मिळाले.

त्यांनी असेही नमूद केले की, खरी समस्या अशी आहे की सुपरकार्स आणि हाय-एंड कार या इंधन मिश्रणामुळे सर्वाधिक प्रभावित होतात, तरीदेखील याबद्दल कुणी बोलण्याची हिंमत करत नाही. याचे कारण म्हणजे फेज सेपरेशन, कारण इथेनॉल हवेतून ओलावा शोषून घेतो. जर कार काही दिवस थांबवून ठेवली, तर टाकीमध्ये पाणी वेगळे होऊ शकते, ज्यामुळे इंधन दहन (Combustion) बिघडते किंवा कार सुरूच होत नाही. धिल्लोन यांनी या पोस्टमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनाही टॅग केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.