Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोटात जोराची कळ, हायवेवर शौचालय दिसेना, गाडी पळवल्यानं मलाच ४ वेळा दंड झाला; न्यायमूर्तींनी NHAIला फटकारलं

पोटात जोराची कळ, हायवेवर शौचालय दिसेना, गाडी पळवल्यानं मलाच ४ वेळा दंड झाला; न्यायमूर्तींनी NHAIला फटकारलं
 

राष्ट्रीय महामार्गावर भरावा लागणारा टोल, वेग मर्यादा ओलांडणे यामुळे दंडात्मक कारवाईसुद्धा होते. आता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी टोल घेता, पावती फाडता पण स्वच्छ टॉयलेटची सुविधा देता येत नसल्यावरून नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियाला फटकारलं आहे. केरळ उच्च न्यायालयाने म्हटलं की, एनएचएआयला महामार्गावर सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छताही करता येत नाही. पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेल्या स्वच्छतागृहांच्या वापराबाबत दाखल केलेल्या याचिकेवर केरळ हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टानं महामार्गावर सोयीसुविधांचा अभाव असल्याच्या कारणावरून एनएचएआयचे कान टोचले.

न्यायमूर्ती रावल यांनी स्वत:चा प्रवासाचा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, जयपूर ते रणथंबोर प्रवास करताना वाटेत एकही शौचालय नव्हतं. पण रस्त्यात वेग मर्यादा ओलांडल्यानं चारवेळा चलान द्यावं लागलं. सार्वजनिक टॉयलेटच्या नादात गाडीचा वेग वाढवायला लागला आणि हा दंड झाला असंही न्यायमूर्ती म्हणाले. 
 
पेट्रोल पंपांच्या मालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत म्हटलं होतं की, पंपावर असलेले स्वच्छतागृह सार्वजनिक वापरासाठी देता येणार नाही. यावर उच्च न्यायालयाने महामार्गावर सार्वजनिक स्वच्छतागृहांची जबाबदारी एनएचएआयची असल्याचं सांगितलं. न्यायालयाने इतर देशांच्या तुलनेत भारतात सार्वजनिक स्वच्छतागृहे खूपच कमी असल्याचं सांगितलं.

राष्ट्रीय महामार्गावर स्वच्छतागृह असणं आणि त्याची देखभाल दुरुस्ती करणं हे एनएचएआयचं कर्तव्य आहे. जर तुम्ही परदेशात गेला तर थोड्या थोड्या अंतरावर चहा कॉफी पिऊ शकता आणि स्वच्छतागृहांचाही वापर करू शकता. पण आपल्याकडे तसं नाहीय. महामार्गावर असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था असून नसल्यासाऱखी आहे. ही बाब खूपच वाईट आहे.

केरळ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने याआधीच्या कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिलं होतं. महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृह सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करून द्यावेत असा आदेश दिला गेला होता. यावर हायकोर्टानं आदेशात सुधारणा करताना म्हटलं की, जे पेट्रोल पंप महामार्गावर नाहीत ते सर्वसामान्यांना स्वच्छतागृहाचा वापर करण्यापासून रोखू शकतात.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.