पोलीस अधीक्षकाने त्याची आई आजारी पडल्यानं पोलीस हवालदार पाठवून डॉक्टरांना जबरदस्तीने गाडीत घालून उपचारासाठी नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या बळाचा वापर करून डॉक्टरांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात येतोय. उत्तर प्रदेशातील इटावा इथं ही घटना घडलीय. डॉक्टर भीमराव आंबेडकर रुग्णालयात इमर्जन्सी वॉर्डमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर राहुल बाबू आणि एका फार्मासिस्टला पोलीस कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने दवाखान्यातून नेलं.
गुरुवारी मध्यरात्री वरिष्ठ पोलीस अधीक्षकांची आई अचानक आजारी पडली. त्यानंतर पोलीस ठाण्याचे हवालदार आणि शिपाई डॉक्टर भीमराव आंबेडकर रुग्णालयात गेले. तिथं इमर्जन्सी वॉर्डमध्ये ड्युटी करणाऱ्या डॉक्टर राहुल बाबू यांच्याशी गैरवर्तन केलं. त्यांच्यासह एका फार्मासिस्टला जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि उपचारासाठी पोलीस अधिकाऱ्याच्या घरी नेलं.डॉक्टरांशी केलेल्या या गैरवर्तनानंतर सर्व मेडिकल स्टाफ आणि डॉक्टर्सनी संप पुकारला आहे. यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय सेवा ठप्प झालीय. गुंडागर्दी करणाऱ्या आणि गैरवर्तन केलेल्या अधिकाऱ्यासह पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. कारवाई केली तरच आम्ही काम करू असा पवित्रा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी घेतलाय.डॉक्टर राहुल बाबू यांनी सांगितलं की, रात्री तीन पोलीस आले आणि त्यांनी एसएसपींच्या आईची तब्येत बिघडलीय, त्यांना चेक करायला चला असं म्हणाले. आम्ही व्यवस्था करत होतो तोपर्यंत जबरदस्तीने नेण्यात आलं. माझा मोबाईल हिसाकवून घेतला. तुम्ही एसएसपींपेक्षा मोठे आहात का असं म्हणत ओढत नेलं. आम्ही सतत स्टाफ पाठवून देतो, इमर्जन्सी वॉर्डमधून जाता येणार नाही असं सांगत होतो तरी त्यांनी ऐकलं नाही असंही डॉक्टर राहुल बाबू म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.