Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर :- गरीब असल्याचा फायदा घेऊन वेश्‍या व्यवसाय चालवायचा, लॉजवर पोलिसचं ग्राहक बनून गेले अन्...

कोल्हापूर :- गरीब असल्याचा फायदा घेऊन वेश्‍या व्यवसाय चालवायचा, लॉजवर पोलिसचं ग्राहक बनून गेले अन्...
 

महिलांच्या आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेऊन वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या लॉजवर पोलिसांनी छापा टाकून मालक जयसिंग मधुकर खोत (वय २६) याला ताब्यात घेतले.

दोन महिलांची सुटका:

पोलिसांनी या कारवाईत उत्तर प्रदेश आणि रायगड जिल्ह्यातील दोन पीडित महिलांची सुटका केली असून, ९,२५० रुपये रोख आणि मोबाईलसह साहित्य जप्त केले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई:

पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या आदेशाने, निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या टीमने ही यशस्वी कारवाई केली. महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन वेश्‍या व्यवसाय चालविणाऱ्या व्हिनस कॉर्नर परिसरातील एका लॉजच्या चालक-मालकाला पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले. जयसिंग मधुकर खोत (वय २६, रा. कुंभारवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. यावेळी उत्तर प्रदेशातील एक व रायगड जिल्ह्यातील एक अशा दोन पीडितांची सुटका केली. छाप्यात ९ हजार २५० रोख, मोबाईल हँडसेटसह अन्य साहित्य जप्त केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. 
 
पोलिसांनी सांगितले की, महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन व्हिनस कॉर्नर परिसरातील एका लॉजमध्ये वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून आज सायंकाळी तेथे छापा टाकला. यावेळी मालक जयसिंग खोत याला ताब्यात घेतले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली.

पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षतील सहायक पोलिस निरीक्षक स्वाती यादव व उपनिरीक्षक राजेंद्र घारगे व हिंदुराव चरापले, पोलिस अंमलदार सायली कुलकर्णी, विलास किरोळकर, अश्विन डुणूंग, उत्तम सडोलीकर, राकेश माने, तृप्ती सोरटे, प्रज्ञा पाटील व अमित मर्दाने यांनी ही कारवाई केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.