Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेत बेदाणा व्यापाऱ्याची 75 लाख रुपयांची फसवणूक

मिरजेत बेदाणा व्यापाऱ्याची 75 लाख रुपयांची फसवणूक


मिरज : मिरजेतील व्यापाऱ्याकडून बेदाणा खरेदी करून त्याची रक्कम न देता पाटण्यातील व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मिरजेतील व्यापाऱ्याला तब्बल 75 लाख 28 हजार 377 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी केयूर गिरीशकुमार शहा यांनी मनोजकुमार यादव (वय 48, रा. पाटणा, बिहार) याच्याविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

केयूर शहा हे मिरजेतील बेदाणा व्यापारी आहेत. ते स्वत: ‌'जी. एस. शहा ॲण्ड कंपनी‌' या नावाने तर त्यांची पत्नी ‌'दृष्टी ॲग्रोटेक फर्म‌' या कंपनीमार्फत बेदाण्याची विक्री करते. बिहारमधील पाटणा येथील मनोजकुमार यादव हा बेदाणा व्यापारी केयूर शहा यांच्या संपर्कात होता. त्याने केयूर यांच्या जी. एस. शहा ॲण्ड कंपनीकडून 15 लाख 28 हजार 395 रुपये किंमतीचे, तर त्यांच्या पत्नीच्या नावे असणाऱ्या दृष्टी ॲग्रोटेक फर्मकडून 59 लाख 99 हजार 982 रुपयांचा बेदाणा 10 जानेवारी 2023 रोजी खरेदी केला होता. 

परंतु तेव्हापासून त्याने बेदाण्याची रक्कम शहा यांना दिली नव्हती. शहा यांनी मनोजकुमार यादव याच्याकडे बेदाण्याची रक्कम देण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला, परंतु त्याने रक्कम दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच केयूर शहा यांनी याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोजकुमार यादव याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.