Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळास १५ कोटींचा प्राथमिक निधी मंजूर:,महामंडळ सदस्य श्री. रावसाहेब पाटील यांची माहिती

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळास १५ कोटींचा प्राथमिक निधी मंजूर:, महामंडळ सदस्य श्री. रावसाहेब पाटील यांची माहिती


जैन समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळास १५ कोटी रुपयांचा प्राथमिक निधी मंजूर झाला आहे. या निधी मंजुरीसाठी भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठचे उपाध्यक्ष व जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य श्री. रावसाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने मागणी व पाठपुरावा केला होता.

या संदर्भात सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मा. आमदार सुरेशभाऊ खाडे, मा. आमदार सुधीरदादा गाडगीळ, मा. आमदार सदाभाऊ खोत, मा. आमदार सत्यजित देशमुख व मा. आमदार गोपीचंद पडळकर यांनाही पत्र देऊन निधी मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली होती. या सर्व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे व सहकार्यामुळे आणि श्री. रावसाहेब पाटील यांच्या मागणीमुळे हा निधी मंजूर होण्यास यश आले आहे.

महामंडळाचे अध्यक्ष श्री. ललितभाऊ गांधी यांनी देखील नुकत्याच पार पडलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात या निधी मंजुरीसाठी विशेष पाठपुरावा केला. निधी मंजूर केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अल्पसंख्यांक मंत्री माणिक कोकाटे, राज्यमंत्री माधुरी मिसळ व सचिव रमेश जैन यांचे अध्यक्ष श्री. ललितभाऊ गांधी यांनी आभार मानले. या १५ कोटींच्या निधीमुळे जैन समाजासाठी कर्ज, शिक्षण, उद्योजकता व स्वयंरोजगाराशी संबंधित विविध योजना प्रभावीपणे राबविता येणार असून, जैन समाजाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे, असे मत महामंडळ सदस्य व जैन प्रकोष्ठचे उपाध्यक्ष श्री. रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.