Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे :- लग्नात 50 तोळं, गाडीसाठी 25 लाख:, सासरच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या

पुणे :- लग्नात 50 तोळं, गाडीसाठी 25 लाख :, सासरच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या


पुणे: पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेनं आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. उरुळी कांचन जवळील सोरतापवाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दीप्ती मगर-चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

२५ जानेवारीच्या रात्री गळफास  घेऊन तीने आत्महत्या केली आहे. उरुळी कांचन पोलिसांनी याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या विवाहिची सासू सरपंच तर सासरे शिक्षक असल्याची माहिती आहे. या घटनेबाबत मृत विवाहितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर फक्त एक महिना ठिक होता, त्यानंतर तिचा छळ सुरू झाला.

आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नेमकं काय म्हटलंय?

दीप्तीची आई हेमलता मगर वय 50 वर्षे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, माझी मुलगी नामे दिप्ती हिचा दि.23/11/2019 रोजी रितीरिवाजाप्रमाणे रोहन कारभारी चौधरी यांच्यासोबत वृंदावन गार्डन थेउर येथे लग्न झाले. त्यानंतर माझी मुलगी दिप्ती रोहन चौधरी ही तिच्या सासरी नांदण्यासाठी गेली. त्यानंतर सुरवातीचे एक महिना तिचा संसार व्यवस्थित चालला होता. त्यानंतर दि. 25/12/2019 रोजी तिचा पती रोहन चौधरी याने तिच्या चरित्र्यावर संशय घेण्यास सुरूवात केली. तसेच तिचे पती व सासु सासरे, दीर हे तिला तु दिसण्यास आमच्या देखाण्या रूपास साजेशी अशी नाही व तुला घरातील स्वयंपाक सुध्दा येत नाही, तुला कपडे धुता येत नाहीत, तुला घर सुध्दा निटनेटके ठेवता येत नाही, तसेच तु आमच्या शेतात काम करणाऱ्या बायका तरी बऱ्या अशी तु घरात राहते, असं म्हणून तिचा शाररिक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. 

हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरूवात
परंतु तिने सुरवातीला आम्हाला काहीही सांगितले नाही, परंतु तिचा पती हा तीला हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरू केल्यानंतर तिने मला एक दिवशी तिला होत असलेल्या त्रासबाबत सांगितले होते. दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी दिप्ती हिला दिवस गेले व तिची दिनांक 04/05/2023 रोजी तिची डिलेव्हरी झाली व तीला मुलगी झाली असे समजल्यावर तिच्या सासरकडील लोक नाराज झाले. त्यानंतर काही दिवसांनी दिप्ती, तिचे सासरी सोरतापवाडी येथे गेली असताना तिने मला फोन करून सांगितले आमचा एक्सपोर्ट व्यवसाय आहे, तो बंद केला. त्यामुळं तिचा नवरा तिला तु माहेरून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख रूपये आण अशी मागणी करत होता. तेव्हा आम्ही तीला सासरकडील लोकांचा त्रास होवू नये म्हणून तिचे पती रोहन यास 10 लाख रूपये रोख स्वरूपात दिले होते, अशी माहिती दिप्तीच्या आईने तक्रारीत दिली आहे.

लग्नामध्ये तुझ्या बापाने हुंडा म्हणून चार चाकी गाडी आम्हाला दिली नाही. त्यानंतर पुढील काही दिवस रोहन याने माझे मुलगी दिप्ती हिस व्यवस्थित सांभाळले. त्यानंतर काही दिवसातच मुलगी दिप्ती हिने मला सांगितले की, माझे पती हे मला वारंवार टोचुन बोलतात आणि म्हणतात की, जेव्हा तिचे लग्न झाले त्यावेळेस आपले लग्नामध्ये तुझ्या बापाने हुंडा म्हणून चार चाकी गाडी आम्हाला दिली नाही असे वारंवार बोलुन मानसिक व शाररिक त्रास देण्यास पुन्हा सुरूवात केली. तेव्हा आम्ही मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून तिच्या पतीच्या मागणीनुसार, चारचाकी गाडी घेण्यासाठी 25,00,000/- (पंचवीस लाख) रूपये रोख स्वरूपात दिले.

सोन्याचे दागिणे लग्नानंतर तिचे पती व सासु सुनिता यांनी काढून घेतले. आम्ही दिप्तीस लग्नामध्ये सुमारे 50 तोळे सोने स्त्रीधन म्हणून घातले होते ते सर्वच सोन्याचे दागिणे लग्नानंतर तिचे पती व सासु सुनिता यांनी काढून घेतले व मी दिप्तीस दागिण्याबाबत विचारले असता दिप्तीने मला सांगितले की, माझे पती व सासु यांनी सांगितले की, आपण ग्रामीण भागामध्ये राहतो या ठिकाणी चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणावर आहे. तुझ्याकडील सोन्याचे दागिणे हे आमच्याकडे असु देत असे बोलुन त्यांनी सर्व दागिणे काढून घेतले व काही दिवसानी लग्न कार्यात जाताना मी माझ्या सासु व पतीस दागिण्याबदद्ल विचारले असता सर्व दागिणे हे आपण आपल्या नवीन व्यवसायासाठी बँकेत गहाण ठेवले आहेत असे मला सांगितले.
मोठेपणा दाखविण्यासाठी पैशांची मागणी

ऑक्टोबर 2025 मध्ये दिप्ती हिची सासु सुनिता कारभारी चौधरी ही सोरतापवाडी ग्रामपंचायत सरपंच झाली, त्या निवडणुकीमध्ये त्यांना मोठेपणा दाखविण्यासाठी दिप्तीकडे तिचे पती रोहन याने पैशांची मागणी केली, दिप्ती हिने मी आता माहेरून पैसे आणणार नाही असे सांगितल्याने तिचे पती रोहन, सासरे कारभारी व सासु सुनिता, दीर रोहित यांनी तीला शाररिक व मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली व तिचे पती रोहन यांने तुझे माहेरकडील लोक फक्त दिखाव्याने मोठे आहे, पण मनाने तुझासाठी भिकारी आहेत. असे तिला टोचुन बोलून तिचे मानसिक खच्चीकरण केले, तसेच तिची सासु हि नेहमीचं तिला आमचे माहेरील लोकांबाबत खालच्या स्थरावर जावुन शिवीगाळ करीत असल्याबाबत तिने मला वेळोवेळी सांगितले होते, असंही दिप्तीच्या आईने तक्रारीत म्हटलं आहे.

जबरदस्तीने गर्भलिंग तपासणी
अंदाजे नोव्हेंबर 2025 मध्ये माझी मुलगी दिप्ती ही माहेरी आली असताना ती प्रचंड मानसिक रित्या खचलेली व नाराज असलेली दिसत होती. तेव्हा मी दिप्तीस तु खुपचं नाराज दिसत आहे तेव्हा तिने मोठ्याने रडु लागली तेव्हा मी जवळ घेवुन शांत केले व काय झाले आहे असे विचारले असता तिने मला सांगितले की, माझे पोटातील पाच महिन्याच्या बाळाची माझा इच्छेविरूध्द मला पहिली मुलगी असल्या कारणास्तव जबरदस्तीने गर्भलिंग तपासणी करावयाची आहे. असे माझे पती यांनी मला सांगितले. तेव्हा मी त्यास स्पष्टपणे नकार दिल्याने त्या कारणावरून माझे पतीने मला हाताने मारहाण व शिवीगाळ दमदाटी केली. 

तेव्हा माझी सासु सुनिता व सासरे कारभारी हे सुध्दा मला म्हणाले की, आम्हाला आमच्या वंशाला दिवा हवा आहे, तु तपासणी करणार नसेल तर आमचे घरातुन चालती हो असे म्हणाल्याने व तु त्याबाबत तुझे माहेरी सांगु नको असे म्हणून दमदाटी केलेली आहे. त्यानंतर माझे पती रोहन व सासु सुनिता, सासरे कारभारी यांनी दबाव टाकल्यामुळे मी त्याच्या मर्जीनुसार माझी इच्छानसताना गर्भलिंग तपासणी केली तेव्हा माझे पोटातील बाळ हे मुलगी असल्याचे समजल्यावर माझे पती रोहन, सासु सुनिता व सासरे कारभारी व दीर रोहित यांनी माझी इच्छा नसताना जबरदस्तीने माझा गर्भपात केला आहे, असे तिने मला सांगितले तेव्हा मला धक्का बसला परंतु मी तिला आधार देत समजावुन सांगितले व शांत केले. त्यानंतर आमचाउरूळी कांचन गु. २. नं 22/2026 BNS 80,108,85,89,352,351(3),115(2),3(5) लोणीकाळभोर या ठिकाणी ध्रुव अंगण या नावाने रो-हाउस स्किम चालु आहे, त्यामध्ये तुझा वाटा माग अशी मागणी दिप्तीला तिचा पती रोहन वारंवार करत होता व त्यातुन येणारे पैसे हे आपल्या दोघांसाठी आपण वापरू असे तो दिप्तीस म्हणत होता त्याबाबत दिप्तीने मला सांगितले होते.
पैसे घेवून त्रास दिला

माझी मुलगी दिप्ती हिस तिचा पती 1) रोहन कारभारी चौधरी 2) सासु सुनिता कारभारी चौधरी 3) सासरे कारभारी चौधरी 4) दीर रोहित कारभारी चौधरी सर्व रा. कडवस्ती सोरतापवाडी ता. हवेली जि. पुणे यांनी माझी मुलगी दिप्ती हिला चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरून हुंड्याची मागणी करून वेळोवेळी पैसे आणण्यासाठी मागणी केली, पैसे घेवून त्रास दिला, जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडून तसेच तिला टोचून बोलुन या सर्व दिलेल्या त्रासाला व छळाला कंटाळून माझी मुलीने राहत्या घरी आत्महात्येस प्रवृत्त केले आहे, मुलीच्या आत्महत्येस तिचे पती, सासु, सासरे व दीर हे कारणीभुत झाले आहेत म्हणून माझी 1) रोहन कारभारी चौधरी 2) सासु सुनिता कारभारी चौधरी 3) सासरे कारभारी चौधरी 4) दीर रोहित कारभारी चौधरी सर्व रा. कडवस्ती सोरतापवाडी ता. हवेली जि. पुणे यांचे विरुध्द तक्रार आहे.

पती, दीर आणि सासू-सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
उरुळी कांचन जवळील सोरतापवाडी मध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. तीन वर्षाच्या मुलीसमोरच इंजिनियर विवाहितेनं गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. पती, दीर आणि सासू-सासरे यांच्या विरोधात याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रोहन चौधरी असे पतीचे नाव आहे तर सुनीता चौधरी सासूचे नाव आहे, कारभारी चौधरी सासरे तर रोहित चौधरी दिराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेनं आत्महत्या केल्याचं बोलंल जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. अधिकचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.