पुणे: आरोग्य विभागांतर्गत असलेल्या सर्वच रुग्णालयांमध्ये उपचार सशुल्क असल्याचे काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाने नागरी सनदेद्वारे जाहीर केले होते. त्यावरून माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली असून सर्व उपचार मोफत असल्याचा खुलासा आरोग्य विभागाचे उपसचिव कैलास साळुंके यांनी सोमवारी पत्राद्वारे केला.
उपचार सशुल्क असल्याचे पत्र अनावधनाने जोडले गेल्याचे स्पष्ट करत आरोग्य विभागाने त्यांची चूक कबूल केली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा या घटनेतून समोर आला आहे. आरोग्य विभागातील सर्व उपचार अडीच वर्षापूर्वी मोफत केले आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाने १६ जानेवारीला नागरिकांची सनद प्रसिद्ध केली. त्यामध्ये त्यांनी २०१५ च्या शासन निर्णयातील दराचे पत्रक अनावधनाने जोडल्याची कबुली दिली आहे. आता पुन्हा ९ फेब्रुवारीला शुद्धिपत्र काढून हे दरपत्रक वगळण्याची नामुष्की अधिकाऱ्यांवर ओढवली आहे. तर शासकीय रुग्णालयांतील तपासणीचे दर पूर्वीप्रमाणेच निःशुल्क केल्याचा खुलासा केला आहे.
आरोग्य संचालकांची चुप्पी
राज्याच्या
आरोग्य विभागाला डॉ. नितीन अंबाडेकर व डॉ. विजय कंदेवाड हे दोन आरोग्य
संचालक नियुक्त केले आहेत. मात्र, दोन्ही संचालक हे माध्यमांसोबत बोलत
नसल्याने आरोग्य विभागातील माहितीची खात्री होत नाही. यावर
आरोग्यमंत्र्यांनी तोडगा काढावा, अशी मागणी आरोग्य विभागातील कार्यकर्ते
करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.